करमाळा शहरातील होणारी धोकादायक जड वाहतूक बंद.
करमाळा (प्रतिनिधी राजु सय्यद)
करमाळा शहरातील मध्यभागी असलेले गायकवाड चौक ते करंजकर हॉस्पिटल रस्त्या दरम्यान होत असलेली जड वाहनाची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या रस्त्यावर डॉ. करंजकर यांचे समर्थ बालरुग्णालय,डॉ. शेलार यांचे शेलार हॉस्पिटल व क्रीडा संकुल देखील आहे. तालुक्यातील दोन नावाजलेले हॉस्पिटल असल्यामुळे रुग्ण संख्या या ठिकाणी जास्त असते. रुग्णांना भेटायला येणारे नातेवाईक पण तेवढेच असतात व मैदानावर खेळणारे लहान,मोठी मुले देखील तेवढेच असतात. जड वाहतुकीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपालिकेने या आधीपण या रस्त्याची जड वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. पण जड वाहन वाले नगरपालिकेने लावलेले बॅरिकेड तोडून वाहने त्या रस्त्याने ने आण करत होते. त्यामुळे नगरपालिका प्रशासन व नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी धोकादायक जड वाहतूक रोखण्यासाठी कितीही जड वाहनाने धडक दिली तरी न तुटणारे बॅरिकेड बसवल्यामुळे जड वाहनांना तेथून काढता पाय घ्यावा लागत आहे. त्यामुळे जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी व अपघात सदृश्य परिस्थिती तून नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला असल्यामुळे नागरिकांतून नगरपालिका प्रशासन व नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
stay connected