दादेगाव ते देवळाली रस्ता असून अडचण नसून खोळंबा
रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावे सुरेश कांबळे यांची मागणी
आष्टी/संदिप जाधव
आष्टी तालुक्यातील कडा ते देवळाली हा 14 किलोमीटर अंतराचा रस्ता असून मध्यंतरी कडा ते डोंगरगण रस्त्यावरील खड्डे बुजले होते परंतु दादेगाव ते देवळाली हा रस्ता असून अडचण नसून खोळंबा अशाप्रकारे झालाय तर याची त्वरित दुरुस्ती
करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा जनहीत लोकशाही पार्टी बीड जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे केली आहे कडा ही महत्त्वाची बाजारपेठ असल्याने घाटपिंपरी ,देवळाली , लोखंडवाडी ,व गहुखेल या लोकांना याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो परंतु या रस्त्यावर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही प्रत्येक वेळी या रस्त्याचे काम होते परंतु ठेकेदाराकडुन या रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याने लवकरच या रस्त्यावर खड्डे पडतात त्यामुळे या रस्त्याची चांगल्या पद्धतीने दुरुस्ती व्हावी एवढे खड्डे पडले आहेत तरी संबंधित विभागाने दखल घेऊन या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी सुरेश कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे
stay connected