माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी आझाद शेख यांची निवड.
स्वराज्य बहुउद्देशीय संस्था संचलित माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या संघटनेच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी करमाळा शहरातील आझाद रफिक शेख यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ संघटनेचे संस्थापक सुभाश बसवेकर यांच्या हस्ते पत्र देऊन निवड करण्यात आली. आझाद शेख यांना समाजकारण व राजकारणाची आवड आहे. त्यांनी अल सहारा सोशल ग्रुपच्या माध्यमातून समाज कार्याची सुरुवात केली होती. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे करमाळा शहर उपाध्यक्ष देखील आहे. त्यांच्या या निवडीने तालुक्यातून समाजातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
stay connected