मुरबाडमधे बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट...!
दोन "देव माणूस" गजाआड..?
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.२ मुरबाड(ठाणे) : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात धसई प्राथमिक आरोग्य केंद्रातून चार वर्षापूर्वी रिटायर झालेला शिपाई पांडुरंग घोलप याने रिटायरमेंट नंतर धसईत दवाखाना टाकला होता.या मुन्ना भाईच्या चुकीच्या उपचारामुळे धसईतील पाच आदिवासींचा मृत्यू झाला होता.त्यानंतर पांडुरंग घोलापवर गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या होत्या.
याच घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा मुरबाड तालुक्यात घडली आहे.
कंपाउंडरने चुकीचं इंजेक्शन दिल्यानं पाच आदिवासींचे बळी गेल्यानंतर पुन्हा एकदा मुरबाडचे आरोग्य विभाग खडबडून जागे झाल्याचं पाहायला मिळतंय. मुरबाडच्या आरोग्य विभागाने आता बोगस डॉक्टरांवर धाडसत्र सुरू केलंय. या कारवाईमध्ये दोन बोगस डॉक्टरांवर शनिवारी कारवाई करण्यात आली आहे. या डॉक्टरांचे दवाखानेही सील करण्यात आले असून त्यांना टोकावडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. विठ्ठल बुरबुडा आणि प्रमोद धनगर अशी अटक करण्यात आलेल्या दोन बोगस डॉक्टरांची नावे आहेत. ग्रामीण भागातील अडाणी गावकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत हे भामटे गावकऱ्यांसाठी ‘देव माणूस’ बनून त्यांच्या आरोग्याशी खेळ खेळत होते. मात्र आता अशा सर्व बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
चुकीच्या इंजेक्शनमुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याने बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा
मुरबाड तालुक्यातील धसई प्राथमिक आरोग्य केंद्रातून चार वर्षांपूर्वी रिटायर झालेला शिपाई पांडुरंग घोलप यानं रिटायरमेंटनंतर धसईत दवाखाना टाकला होता. या मुन्नाभाईच्या चुकीच्या उपचारांमुळे धसईतील पाच आदिवासींचा मृत्यू झाला होता. यानंतर पांडुरंग घोलपवर गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुरबाड आरोग्य विभागाला खडबडून जाग आली. त्यानंतर मुरबाड तालुक्यातील डॉक्टरांची झाडाझडती आरोग्य विभागानं सुरू केली आहे. या कारवाईत शनिवारी आरोग्य विभागाने टोकावडे येथील बोगस डॉक्टर विठ्ठल बुरबुडा आणि मोरोशी येथील बोगस डॉक्टर येथील प्रमोद धनगर या दोघांवर कारवाई करण्यात आली. दोघांनाही टोकावडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. तर उमरोली इथला एक एक बंद दवाखाना सील केला आहे. या कारवाईमुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले असून त्यांनी आपली दुकानं बंद करून पळ काढायला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात ग्रामस्थांच्या अज्ञानाचा फायदा घेत असे अनेक मुन्नाभाई बिनधास्तपणे डॉक्टर बनून आपली दुकानं चालवतायत. या सगळ्यांवर आता कठोर कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
stay connected