बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ एम आय एम च्या वतीने तहसीलदार निवेदन
दि ४ फेब्रुवारी
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन चे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी हे उत्तर प्रदेश येथे निवडणूक प्रचारात असताना आपल्या प्रचार सभा व पदयात्रा संपून ते दिल्ली कडे प्रस्थान करत असताना येथील उत्तर प्रदेश - दिल्ली रोड वरील छिजारसी टोल नाक्यावर गाडी स्लो झाले असताना त्यांच्या ताफ्यावर दोन इसमांनी बेछूट गोळीबार करत त्यांच्या गाडीवरती चार राऊंड फायर केले त्यामध्ये त्यांच्या गाडीच्या पुढील डावा टायर पंचर झाला व पुढील व पाठीमागील डाव्या दरवाजावरती दोन गोळ्या लागल्या सुदैवाने त्यांचा जीव त्याच्यामध्ये बचावला या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला एमआयएम चे तालुका अध्यक्ष डॉक्टर अन्सार शेख यांच्या नेतृत्वाखाली आज कर्जत तहसील कार्यालय मध्ये तहसीलदार श्री नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले यामध्ये त्यांनी बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी यांच्यावर यापूर्वी देखील हल्ले झाल्याचे तहसीलदार यांना बोलताना सांगितले एम आय एम चे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच हैद्राबाद संसद क्षेत्राचे स्टॅंडिंग खासदार आहेत. उत्तर प्रदेश मध्ये आचारसहिता असताना अशा प्रकारचा गोळीबार होन हे एक गंभीर आणि देशासाठी चिंतेची बाब आहे एम आय एम पक्षाच्यावतीने महामहीम राष्ट्रपती यांना या निवेदनाद्वारे त्यांच्यासाठी झेड प्लस सुरक्षा मिळावी ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे तसेच या घटनेमागे असणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर ती कठोर कारवाई करावी असे या निवेदनाद्वारे म्हटले आहे यावेळी माजी तालुका अध्यक्ष जब्बार सय्यद तालुका उपाध्यक्ष मुबारक सय्यद अन्सार शेख आमीन झारेकरी सुफियान सय्यद मुद्दसर झारेकरी फिरोज बेग रहीम भाई शेख डॉक्टर रिजवान शेख जुनेद सय्यद अरबाज पठाण तनवीर झारेकरी मुजफ्फर कुरेशी आतीक सय्यद हजर बॅग सोहेल बागवान अरबाज सय्यद यांसह एम आय एम पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----
प्रतिनिधी असलम पठाण कर्जत अहमदनगर
stay connected