*आष्टीत आईच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आणि निराधार मुलांना ५० किलो गहू व खाऊ वाटप*
************************
************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील बोडखे प्रेसमधील नामांकीत डिझाईनर आकाश लक्ष्मणराव डोंगरे याने आपल्या मातेच्या सौ.नंदाबाई लक्ष्मण डोंगरे यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त आष्टी शहरातील नवजीवन संगोपन
केंद्रातील अनाथ,निराधार बालकांसाठी गहु व बिस्कीट,
खाऊ वाटप केला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे,सामाजिक कार्यकर्ते बलभीमराव सुंबरे,पत्रकार उत्तम बोडखे यांच्या हस्ते धान्य व खाऊ वाटप केले.यावेळी सेवानिवृत अभियंता तात्यासाहेब पोकळे, शिवसेना नेता मुटकुळे,प्रा.विजय राजपुरे,संपत सायकड मान्यवर उपस्थित होते.आष्टी येथील या बालसंगोपन केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक,सांस्कृतिक,
शैक्षणिक,आरोग्य,शेती विषयक उपक्रमाबरोबरच भटकेविमुक्त,आदिवासी,ऊस तोडमजूर, वीटभट्टी कामगार, वंचित व दुर्लक्षित घटकातील गोर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या नवजीवन संगोपन केंद्रातील अनाथ निराधार ऊसतोड मजूर वीटभट्टी कामगार वंचित घटकातील गोरगरीब मुलांना मातकुळी येथील आकाश डोंगरे यांनी आपल्या मातोश्रीच्या वाढदिवसा-
निमित्त नवजीवन संगोपन केंद्रातील अनाथ निराधार मुलांना ५० किलो गहू आणि मुलांना खाऊ वाटप केले.
यावेळी संस्थापक विकास म्हस्के यांनी नवजीवन केंद्रविषयी माहिती दिली.हे संगोपन केंद्र हे समाजातील दानशूर व्यक्तीच्या सहकार्यातून सहभागातून चालते.यास शासनाचे कोणतेही अनुदान नाही.यावेळी जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे म्हणाले की, आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून इतरत्र अनावश्यक खर्च टाळून आज आकाशने गरजू व गरीब मुलांना आवश्यक असलेल्या गहू आणि खाऊचे वाटप केले.हे सामाजिक काम करण्यात वेगळाच आनंद असतो असेही ते म्हणाले. यापुढे नवजीवन संगोपन केंद्र आष्टीसाठी जी काही मदत लागेल ती आम्ही देऊ असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे की,शासन कुठलेही अनुदान नसताना लोकांच्या मदतीवर हे संगोपन केंद्र सुरु आहे.
लोकप्रतिनिधींनी या केंद्राला शासकीय मदत मिळवुन द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी समाजसेवक बलभीमराव सुंबरे म्हणाले की,जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि आ.
बाळासाहेब आजबे यांच्या मदतीने या अनाथ ,निराधार मुलांच्या बालसंगोपन संचलन मेजर म्हस्के यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा.विजय राजपुरे सर यांनी मानले.
stay connected