शेवगाव तालुका प्रतिनिधी प्रविण भिसे
राज्यशासनाने किराणा दुकानात वाईन विक्रीचा काढलेला आदेश त्वरित मागे घ्यावा-अनिल सुपेकर
महाराष्ट्र शासनाने नुकतीच किराणा दुकानात तसेच बेकरी आणि मॉलमध्ये वाईन विक्री चा आदेश पारित करून चुकीचा निर्णय घेतला आहे सदर वाइन दारू विक्रीमुळे सामान्य लोकांचे फार मोठे नुकसान होणार आहे तसेच भारतीय महाराष्ट्र सर्व धर्मामध्ये वाईट समजल्या जाणाऱ्या दारू चे प्रकार वाइन की ज्यामध्ये 16.5 टक्के पर्यंत अल्कोहोल चे प्रमाण असते अश्या या दारूच्या प्रकाराला किराणा दुकान बेकरी व मॉलमध्ये विक्रीसाठी परवानगी देऊन महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान केले आहे सार्वजनिक ठिकाणी वाईन विक्री केली गेली तर पुढील प्रमाणे मोठे नुकसान होणार आहे
(१)किराणा मालाच्या दुकानात जीवनावश्यक वस्तू खरेदी साठी महिलावर्ग येत असतो त्यांच्या सोबत लहान मुलेही असतात वाईनकडे दारु म्हणूनच पाहिले जाते त्यात अल्कोहोलचे प्रमाण किती आहे याचा विचार न करता जर मुलाने वाईन मागितली तर पालक ते देणार काय ? तसेच ज्या दुकानात वाईन विक्रीला असेल तर त्या दुकानात ग्राहक येणारही नाही हल्लीची पिढी ही अगोदरच व्यसनाधीन आहे परंतु फक्त शेतकऱ्यांना फायदा होईल या खोट्या आशेवर व शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आपण येणाऱ्या पिढीला व्यसनाधीन व पंगू करू शकत नाही तसेच यामुळे गुन्हेगारीचे अपघाताचे प्रमाण वाढेल कारण दारु ही प्रत्येक पापाची जाननी आहे
(३) वाईन संस्कृती ही आपली संस्कृती नाही महाराष्ट्राला धार्मिक आध्यात्मिक परंपरा आहे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्यासाठी वाईन संस्कृती आपण आणि चुकीचे आहे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्या सोयाबीन हमीभाव दिल्याने शेतकरी त्याचे उत्पादन घेत आहेत शेतकऱ्यांचा फायदा होतो असे सांगून किराणा दुकानात वाईन विक्रीला ठेऊन नव्या पिढीला व्यसनाधीन बनविण्याचा सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे
(४) गेल्या अडीच वर्षापासून शासनाने केलेल्या काही चांगल्या कामावर असा निर्णय घेऊन पाणी फिरविले आहे संध्या एनर्जी ड्रींकच्या नावाखाली काही पेये बाजारात आहेत मॉल्स औषध दुकानात ती सहज उपलब्ध होत असल्याने अनेक मुले त्यांच्या आहारी गेले आहेत हाच प्रकार वाईन बाबत होण्याची शक्यता आहे त्यात किती प्रमाणात अल्कोहोल आहे हा वेगळा विषय आहे पण केवळ महसूल मिळविण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा या सर्व कारणांमुळे किराणा दुकानात विक्री करून शासन एक प्रकारे राज्याला महाराष्ट्राच्या ऐवजी मद्य महाराष्ट्र नवीन ओळख देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचे नाव खराब करण्याचे काम प्रशासनामार्फत चालू आहे तसेच काही मंत्री आमदार व खासदार आणि त्यांच्या मुलांच्या व स्वतःच्या तसेच इतर नातेवाईकांच्या वाईन कंपनीतील वाईन चा सेल होण्यासाठी शेतकऱ्यांचे नाव घालून स्वतःच्या फायद्यासाठी काढलेला हा अध्यादेश आहे तसेच लोकांच्या हितासाठी शासनाला काढलेला अध्यादेश मागे घेता येत नसेल तर शासनाने पायउतार व्हावे तर शासन आम्ही व्यवस्थित पणे चालू शकतो शासनाचा निषेध म्हणून मी आपणास हे निवेदन देत आहोत यावेळी प्रविण भिसे यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले व निवेदन देतेवेळी स्वाभिमानी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर स्वाभिमानी मराठा महासंघाचे तालुका उपाध्यक्ष दादासाहेब चेडे स्वाभिमानी मराठा महासंघाचे तालुका युवा कार्याध्यक्ष प्रवीण भिसे उपस्थित होते या निवेदनाच्या प्रती माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय जिल्हाधिकारी साहेब आमदनगर व पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांना पाठविले आहेत
stay connected