*माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या गाडीचा अपघात.*

 *माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या गाडीचा अपघात.*




केज (प्रतिनिधी) – केज विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झालेले नाही . माजी आमदार साठे हे केज बीड महामार्गावरुन जात असताना केज पासून जवळच असलेल्या टाकळी फाट्यावर पेट्रोल पंपासमोर दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे . या अपघातात त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली आहे. यामध्ये गाडीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे . परंतु यात सुदैवाने कुणीही गंभीर जखमी झालेले नाही . माजी आमदार साठे यांच्या डाव्या हाताला काही मार लागला आहे. मस्साजोग कडे ते लग्नासाठी जात असल्याचे कळते. सदर घटना शनिवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास घडली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.