संधी असलेल्या ठिकाणी सोलर व पवनऊर्जा प्रकल्प चालू करावेत ----- ना.धनंजय मुंडे,
विरोधकांनी खोटे बोलून जनतेची दिशाभूल करू नये---- आ. बाळासाहेब आजबे
------------
आष्टी, (प्रतिनिधी) - बीड जिल्ह्यातील शेतकरी वीज देयके भरत नाही, अशी ओरड आहे. मात्र, कृषी धोरणांमध्ये बीड जिल्हा मराठवाड्यात एक नंबरवर आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती होत आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिवसाला आठ तास वीज देणं गरजेचं आहे. मात्र, जिल्ह्यातील शेतकर्यांना पुरेशी वीज दिली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ऊर्जा विभागाने संधी असलेल्या ठिकाणी सोलर व पवनऊर्जा प्रकल्प चालू करावेत, आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील सर्व रस्त्याची कामे महाविकास आघाडी सरकारच्या म्हणजेच आमच्या सरकारच्या काळातीलच आहेत व त्याचे श्रेय आ. बाळासाहेब आजबे यांचे आहे हे मी जबाबदार पणे सांगतो, विरोधातील काही लोक त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करून जनतेची दिशाभूल करत आहेत हे योग्य नाही असे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ ना धनंजय मुंढे, आ. बाळासाहेब आजबे माजी आ साहेबराव दरेकर, यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला त्यामध्ये कडा कारखाना येथील 33 केव्ही क्षमतेच्या विद्युत उपकेंद्राच्या लोकार्पण, तवलवाडी वाळुंज रस्ता,चार कोटी , केळसांगवी चोभा लिमगाव रस्ता, ग्रामीण रुग्णालय आष्टी येथील ऑक्सिजन प्लांट चा लोकार्पण सोहळा या सर्व कामांचे उद्घाटन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही आनलाईन पद्धतीने हिरवा कंदील दाखविला. ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या 175 जंबो सिलेंडर प्रतिदिन क्षमतेच्या आक्सिजन जनरेशन प्लांट, लिक्विड मेडिकल आक्सिजन टॅंक व दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण तसेच पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उदॆघाटनही आज (ता. आठ) पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार साहेबराव दरेकर, डॅ. शिवाजी राऊत, परमेश्वर शेळके, रामकृष्ण बांगर, सतीश शिंदे, अण्णासाहेब चौधरी, किशोर हंबर्डे शिव भूषण जाधव ,विठ्ठल सानप, दीपक घुमरे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना मुंडे म्हणाले, की जिल्ह्यातील वीजसमस्या गंभीर बनली असून आष्टी तालुक्यात 220 केव्ही क्षमतेचे वीजकेंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. मधल्या काळात वीजबीलांचा भरणा केल्यानंतर जिल्ह्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा चालू करण्यात आला. जिल्ह्यातील वीजेच्या समस्या सोडविण्यासाठी ऊर्जामंत्र्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे वीजेची अनेक कामे मार्गी लागली असली तरी विजेची सर्व कामे मार्गी लागावीत, यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचेही श्री. मुंडे म्हणाले. आष्टी तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून अनेक रस्त्याची कामे मार्गी लागली आहेत अजूनही अनेक कामे प्रस्तावित आहेत ते ही लवकरच मार्गी लागतील याचे सर्व श्रेय आमदार बाळासाहेब आजबे काका यांचे असून त्यामध्ये कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असे शेवटी नामदार धनंजय मुंडे म्हणाले.
यावेळी आमदार बाळासाहेब आजबे माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी गोवर्धन सानप, ,काकासाहेब शिंदे, महादेव डोके , जगन्नाथ ढोबळे, भाऊसाहेब घुले अशोक पोकळे,शिवाजी शेकडे,बाबुराव जाधव, नाजिम शेख, संतोष सुरोशे, महादेव शिखरे, जालिंदर नरोडे, संदिप अस्वर,डॉक्टर सुनील गाडे,ताराचंद कानडे, समीर जठोत, बबन पडोळे, सुधीर जगताप ,अजून काकडे, बबन रांजणे, सिद्धेश्वर झंजे,संतोष काकडे यांच्या सह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(चौकट)
विरोधक खोटे बोलून जनतेची फसवणूक करत आहेत--आ. आजबे
काही कामासाठी पूर्वीच्या काळात शिफारस झाली असली तरी त्यासाठी पाठपुरावा, मंजुरी व निधी मिळून देने महत्वाचे आहे या सरकारने वरील कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अशाच कामाचे उदॆघाटने मी करत असून आमच्या काळात मंजुरी मिळालेल्या कामांची उदॆघाटने लोकप्रतिनिधी करत आहेत. खोटी व बनावट कामे करणारे काहीही बनाव करून जनतेची दिशाभूल करू शकतात, असा टोलाही आमदार बाळासाहेब आजबे यांनी विरोधकांना लगावला.
-------------
महाराष्ट्र अंधारात जाऊ देणार नाही-- मंत्री नितीन राऊत
कोंविडचे आज पर्यंत अनेक संकटे आली तरी महाराष्ट्राला अंधारात जाऊ दिलं नाही यापुढेही महाराष्ट्र अंधारात जाऊ दिला जाणार नाही जरी कोळशाची अडचण निर्माण होत असली तरीही लवकर सोडू आणि बीड जिल्ह्यातील जनता ही यापुढे अंधारात जाऊ दिली जाणार नाही अशी ग्वाही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगितले आहे.
stay connected