तुम्ही प्रस्तावित केलेल्या कामाचेच नारळ फोडा
----------- आ.सुरेश धस
******************************
आष्टीसह जिल्ह्याभरात प्रस्ताव एकाचे नारळ फोटतोय एक आ.धसांचा टोला
*******************************
********************************
आष्टी (प्रतिनिधी)
मेहकरी तलाव पुलाच्या उदघाटनाबरोबरच हे उदघाटन आम्ही करणार होतो,मात्र कार्यकर्त्याच्या घरात लग्नकार्य असल्याने रद्द केले होते.ज्यावेळेस तुम्ही आमदारही नव्हते त्यावेळेस प्रस्ताव दाखल केले आहेत,फक्त टेंडर तुमच्या कालावधीत झाले म्हणून जर आम्ही रस्ते केले आहेत असे म्हणत असताल हे मात्र दुर्देव आहे.या जिल्ह्यात चाललय काय आष्टीसह,परळी,अंबेजोगाई,बीडमध्ये देखील तेच हेच प्रकार घडत असल्याचे काही वर्तमान पत्रातून आज मी वाचले असून तुम्ही केलेल्या प्रस्तावित केलेल्याच कामाचे नारळ फोडा,
प्रस्ताव एकाचे नारळ फोटतोय एक असा टोला विधानपरिषदचे आ.सुरेश धस यांनी सत्ताधारी यांच्यावर लगावला .
ते आष्टी तालुक्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कडा जवळ तळेवस्ती ते शिरापूर ५ कि.मी.३६८.२१ लक्ष रुपये निधी खर्चून डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन शुभारंभप्रसंगी रविवार दि.६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता बोलत होते.
यावेळी अभियंता साबळे, माजी सभापती अंकुश चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय आजबे,सरपंच अनिल ढोबळे,उपसरपंच संपत कर्डीले, संपत सांगळे,संजय ढोबळे,
यशवंत खंडागळे,अशोक ढवण आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.धस म्हणाले, नागरिकांची अनेक वर्षांपासून इकडे आलो की या रस्ता बाबत मागणी असायची या मागणीची दखल घेऊन या रस्ताबाबत वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कडा जवळील तळेवस्ती ते शिरापूर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून हे काम दर्जेदार करावे असे आदेश अधिकारी व ठेकेदार यांना यावेळी आ.धस यांनी दिले.पुढे बोलताना आ.धस म्हणाले, तुम्ही जे काम केले त्याचेच तुम्ही नारळ फोडा ज्या वेळेस तुम्ही आमदार नव्हते त्यावेळेस या कामाचे प्रस्ताव दाखल केले आहेत. फक्त तुमच्या कालावधीत टेंडर झाले म्हणून जर आम्ही रस्ते केले आहे असे म्हणत असेल तर हे मात्र दुर्दैव आहे.मी कधीच दुराग्रह पकडला नाही तुम्ही आणलेल्या कामाचा मी कधीच नारळ फोडला नाही. या जिल्ह्यात चालले तरी काय असे प्रकार संपूर्ण जिल्ह्यात घडत असून आष्टीसह परळी, आंबेजोगाई,बीडमध्ये देखील कामाबाबत प्रस्ताव एकाचे आणि नारळ फोडत एक. उद्या परवा जे काही उदघाटने होणार आहेत.त्यामध्ये जे नावे आहेत या कामासंदर्भात देखील लवकरच पत्रकार परिषद घेऊन या कामांच्या पत्राचे पुराव्यासह खुलासे जाहीर करणारा आहोत. केंद्र सरकार योजनामध्ये खासदारांची शिफारस महत्त्वाची असते.त्यांच्या शिफारशींने अनेक कामे मंजूर झाले आहेत.याबद्दल खासदार प्रीतम ताई यांचे देखील आभार मानतो. कडेकरांच्या जमिनी देखील या भागात असून या रस्त्याचा फायदा त्यांना देखील होणार आहे. तलावातील रस्त्याचा तक्रारी असून त्या देखील लवकरच दूर करू हा रस्ता डांबरीकरण झाला की शिरापूर तसेच या रस्त्यावरील सर्व गावांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
या उदघाटन समारंभ प्रसंगी केरबा ढोबळे,के.के.कर्डीले, विनोद रोडे,पांडुरंग कर्डीले,उध्दव कर्डीले, ग्रामसेवक आबासाहेब खिलारे,पत्रकार रघुनाथ कर्डीले, पत्रकार प्रविण पोकळे,सुनील देशमुख,अतुल जाधव,राम मधुरकर आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व शिरापूर व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
stay connected