बॅरीस्टर ओवेसीच्या गाडीवर गोळीबार

 


ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे मेरठहून परतत असताना त्यांच्या वाहनावर गोळीबार झाल्याचा दावा केला आहे. वाहनावरील गोळ्यांच्या खुणा शेअर करताना ते म्हणाले, "काही वेळापूर्वी माझ्या वाहनावर चिजारसी टोल गेटवर गोळीबार झाला 4 राऊंड गोळीबार करण्यात आला." असदुद्दीन ओवेसी पुढे म्हणाले की, हल्लेखोरांमध्ये 3 ते 4 लोक सामील होते, ते सर्वजण पळून गेले आणि तेथे शस्त्रे सोडून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, पण मी दुसऱ्या  गाडीत बसून तिथून निघालो. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. अलहमदुलिल्लाह.
कारवर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. आयजी मेरठच्या म्हणण्यानुसार, टोल प्लाझावर ओवेसी समर्थकांशी बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे, मात्र सध्या गोळीबाराची कोणतीही चर्चा समोर आलेली नाही. काय दावा केला जात आहे त्यासंदर्भात आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहोत. या दाव्यातील सत्यता तपासानंतरच कळेल. असे  पोलीसांनी सांगीतले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.