ऊसतोड मजुरांच्या कोपीतून चोरी करणारे पती-पत्नी सह तिघे पोलिसांच्या ताब्यात
कर्जत दि.२ फेब्रुवारी
पोटाची खळगी भरण्यासाठी परजिल्ह्यातून कर्जत तालुक्यात ऊसतोडणीसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्या कोप्यांची कुलुपे तोडून बाजरी व अन्नधान्य इंडिका गाडीत भरून पलायन करणाऱ्या 'बंटी-बबलीच्या' कर्जत पोलिसांनी मुसक्या आवळल्या तसेच त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन साथीदारांवरही गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या बंटीने शेळ्या चोरीचीही कबुली दिली आहे
अमोल रमेश सुलताने, मूळ रा किनखेड, ता. मूर्तिजापूर, जिल्हा अकोला, हल्ली राहणार कनगर, ता. राहुरी, जिल्हा अहमदनगर व गिता अमोल सुलताने अशी ताब्यात घेतलेल्या बंटी -बबलीची नावे आहेत तर त्यांचे साथीदार सुनिल सुभाष बर्डे, अनिल ऊर्फ भिमराज निकम (सर्व रा.राहुरी अ.नगर) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील येसवडी गावच्या शिवारात ऊसतोडणीसाठी आलेल्या आप्पा धनंजय भिल्ल (काकडदा ता.शाहदा जि.नंदुरबार) या ऊसतोड मजुराच्या बंद कोपीचे कुलूप तोडून आरोपींनी कोपीतील १०० किलो बाजरी आपल्या इंडिका (एम.एच ४२ ए.१४११) या गाडीत भरून घेऊन जात असताना पोलिसांनी अमोल सुलताने, गिता सुलताने या दोन आरोपींना राशीन येथे ताब्यात घेतले. फिर्यादीवरून आरोपींवर भादवी कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
अटक आरोपींना कर्जत न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन रिमांड मुदतीत अधिक तपास केला असता अमोल सुलताने व अनिल ऊर्फ भिमराज निकम यांनी गणेशवाडी (ता.कर्जत) येथील दोन ठिकाणावरून शेळ्यांची चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपी अमोल याच्यावर मूर्तिजापूर शहर आणि मूर्तिजापूर ग्रामीण या ठिकाणी यापूर्वीचे 12 गुन्हे दाखल आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे, तुळशीराम सातपुते हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षीक दिनकर मुंडे, भगवान शिरसाठ, स.फौजदार तुळशीराम सातपुते, पो.हे.कॉ. मारुती काळे, पो.हे.कॉ. आण्णासाहेब चव्हाण, पो.कॉ. सचिन वारे, पो.कॉ. भाऊ काळे, पो.कॉ. गणेश भागडे, पो.कॉ. संपत शिंदे, पो.कॉ. अर्जुन पोकळे आदींच्या पथकाने केली आहे .
-----
प्रतिनिधी अस्लम पठाण कर्जत अहमदनगर
stay connected