माॅर्निग वाॅकला गेलेल्या ४७ वर्षीय व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यु
घाटपिंपरी (सुरेश कांबळे )नेहमी प्रमाणे सकाळी माॅर्निग वाॅकसाठी गेलेल्या व्यक्तीला भरधाव वेगात असलेल्या वाहनाने जोराची धडक दिल्याने यात धडकेत त्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी येथील बीड धामणगांव नगर राज्य महामार्गावर घडली. राजेंद्र तुकाराम लोंखडे वय वर्ष ४७ असे त्याचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी येथील राजेद्र तुकाराम लोंखडे वय ४७ वर्ष हे नेहमी प्रमाणे माॅर्निग वाॅक साठी गुरूवारी सकाळी सहाच्या सुमारास गेले असता बीड धामणगांव नगर राज्य महामार्गावर जात असताना नगर कडुन येणार्या भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. अंभोरा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन प्राथमिक आरोग्य केंद्र सुलेमान देवळा येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे.त्याच्या पाश्यात पत्नी, तीन मुले, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर घाटपिंपरी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले
* रस्त्यावर मॉर्निंग वॉक करताना काळजी घ्या ; रोहित बेबरे
अंभोरा ठाणे हद्दीतील लोकांनी रस्त्यावर व्यायाम करताना किवा माॅर्निग वाॅक करत असताना काळजी घ्यावी. पहाटे ही झोपेची वेळ असते चालकाला डुलकी लागु शकते ती डुलकी आपले आयुष्य संपवु शकते म्हणून रस्त्यावर व्यायाम माॅर्निग वाॅक करताना काळजी घ्यावी असे आवाहन अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांनी केले आहे.
stay connected