टिपु सुलतान योद्धा मंचची जामखेड कार्यकारिणी जाहीर
जामखेड / प्रतिनिधी -समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तत्पर असणाऱ्या हजरत टिपू सुलतान एक महान योद्धा युवा मंचची जामखेड शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. मंचच्या जामखेड शहराध्यक्षपदी वसीम उर्फ पप्पू मुन्शी शेख यांची निवड करण्यात आली. तसेच तालुका युवा अध्यक्षपदी युसुफ सत्तार शहा, उपाध्यक्षपदी सय्यद जमीर इब्राहिम, शहर उपाध्यक्ष मातीन बाबमिया सय्यद, युवा शहर उपाध्यक्षपदी सोहेल जावेद शेख
महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख जुबेरभाई शेख, जामखेड तालुकाध्यक्ष नासिर सिराज खान यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी असिफभाई सय्यद, जाकीर शेख, इस्माईलभाई सय्यद, उमरभाई कुरेशी, मुस्तफा शेख मेजर, हुसेनभाई शेख उपस्थित होते. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.
stay connected