रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (ए)आंबेडकर पक्षाच्या राज्य संघटकपदी कैलास जोगदंड यांची नियुक्ती
आष्टी। प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आंबेडकर ) या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनी नुकतीच राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये कैलासभाऊ जोगदंड यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.
आष्टी तालुक्याचे भूमिपुत्र टाकळसिंग येथील कैलासभाऊ जोगदंड अनेक वर्षापासून विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य करत आहेत.त्यांच्याकडे संघटन कौशल्याचा दांडगा अनुभव आहे.त्यांनी केलेल्या समाज कार्याची दखल घेऊन रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (ए) आंबेडकर पक्षाचे महाराष्ट्र पदाधिकारी यांनी जोगदंड यांचे सामाजिक, यांच्या नावाला पसंती दिली आहे.नुकतेच पक्षाचे संस्थापक,राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले देऊन राज्य संघटक पदाची जबाबदारी दिली आहे.
जिल्हात संघटन मजबूत करुन बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणार - कैलास जोगदंड
रिपाइं आंबेडकर या पक्षाची स्थापना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे हा पक्ष म्हणजे बाबासाहेबांनी चालू केलेली चळवळ आहे.हा पक्ष म्हणजे आंबेडकरी विचारांची चळवळ आहे .बहुजनांचा पक्ष आहे.ही चळवळ सध्या दीपक भाऊंच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर व देशभर या पक्षाचे कार्य चालू आहे.संपूर्ण महाराष्ट्रभर या पक्षाचा गावा गावात शाखा तयार होत आहेत. दररोज नवीन नवीन तसेच आंबेडकरी विचारांचे लोक या या चळवळीसोबत काम करण्यासाठी या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत.दलित समाजाच्या न्याय हक्कांसाठी ही चळवळ आहे.जिल्ह्यात समाज संघटन मजबूत करून संघटना दलितांच्या न्याय हक्कासाठी लढणार
stay connected