धनादेश न वटल्या प्रकरणी आरोपीस दोन महिन्याची शिक्षा
——————————————————
आष्टी न्यायालयाचा निर्णय
——————————————
आष्टी(प्रतिनिधी)-शेती घेण्यासाठी उसणवारीत दिलेल्या रकमेपोटी दिलेला धनादेश न वटल्याने कोल्हार येथील एका व्यक्तीस 1 लाख 40 हजार रुपये दंड व दोन महिने कारावासाची शिक्षा न्यायाधीश के.के.माने यांनी दिली. 2014 पासून हा खटला आष्टी न्यायालयात सुरू होता.
याबाबत अधिक माहिती अशी की,आष्टी तालुक्यातील केरूळ येथील गहिनीनाथ मारूती सुरवसे यांनी उसणवारीत राहता तालुक्यातील कोल्हार येथील संजय दिनकर उनवणे यांना उसणवारीत शेती घेण्यासाठी 86 हजार रूपये दिले होते.त्यानंतर दिलेल्या तारखेत पैसे देण्यासाठी 86 हजार रूपायाचा भारतीय स्टेट बॅक शाखा-लोणी या शाखेचा धनादेश दिला होता.परंतु खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो धनादेश वटला नाही.फिर्यादीने वारंवार उनवणे यांच्याकडे मागणी केली.परंतु पैसे न दिल्याने फिर्यादीने आष्टी न्यायालयात अॅड.सय्यद अक्रम ताहेर यांच्या मार्फत फौजदारी दावा दाखल केला.दरम्यान,या खटल्यात न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार न्यायाधीश के.के.माने यांनी आरोपी संजय उनवणे यास 1 लाख 40 हजार रुपये दंड व दोन महिने कारावास शिक्षा सुनावली आहे.या खटल्यात फिर्यादी सुरवसे यांच्या वतीने ॲड.सय्यद ताहेर जमाल यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अक्रम ताहेर सय्यद यांनी काम पाहिले.
stay connected