*विद्युत महावितरण कडून लेखी आश्वासन दिल्याने उदया होणारा रास्तारोको स्थगित :- ज्ञानेश्वर चौधरी*
*कडा (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यात कमीदाबासह सतत खंडीत वीज पुरवठा होत असल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत. त्यामुळे वीज पुरवठा सुरुळीत करण्याच्या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेसह शेतकऱ्यांकडून वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांना रास्तारोकोचे निवेदन देण्यात आले होते त्यासंदर्भात आज महावितरणचे अधिकारी श्री दसपुते साहेब व पोलीस अधीकारी गोसावी साहेब यांनी सकारात्मक चर्चा करून लवकरात लवकर विज पुरवठा सुरळीत चालू करु असे लेखी आश्वासन दिले व उध्या होणाऱ्या रास्ता रोको करु नये अशी विनंती केली. याप्रसंगी शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर दादा चौधरी, प्रा.राम बोडखे सर , शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजमुद्दीन शेख, साईनाथ जगताप, बोडखे सर,पत्रकार रेहमान सय्यद, प्रशांत जाधव युवा नेते काँग्रेस, जेष्ठ नेते माऊली थोरवे,राजू म्हस्के व इतर..*
stay connected