ठाणे दिवा दरम्यान मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक,
सर्व फास्ट लोकल स्लो ट्रॅक वरून धावणार....
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.५ ठाणे : मध्य रेल्वेवर पुन्हा एकदा ७२ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. सध्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामासाठीच हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. ५,६ आणि ७ फेब्रुवारी रोजी हा ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली होती. या मेगा ब्लॉकदरम्यान, शंभर पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ३५० लोकल ट्रेन देखील या मेगा ब्लॉकदरम्यान धावणार नाहीत. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान ५ व्या लाईनवर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप फास्ट लाईन आणि ६ व्या लाईनवर हा मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या ३ दिवस बंद राहणार आहेत. प्रवाशांनी याकाळात सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे
stay connected