शेतकरी कुटुंब मारहाण प्रकरणी
आमदार राजु पाटील आक्रमक,
आपल्यापेक्षा बिहार बरा...
ठाकरे सरकारवर निशाणा..!
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.४ डोंबिवली (ठाणे) : जमिनीसाठी शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याची घटना कल्याण ग्रामीणमधील दहिसर मोकाशी पाडा येथे घडली आहे. या मारहाणीत शेतकरी पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत. तर महिलांसोबतही धक्काबुक्कीही करण्यात आली. शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन घेतला जात नसल्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्याच्या दालनात ठाण मांडले. यावेळी आंदोलन करुन सुद्धा गुन्हा दाखल होत नसेल तर आपल्यापेक्षा बिहार भला, अशी संतप्त प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिलीय. महिलांवर अत्याचार केला जातो, मारहाण केली जात आहे, तरीही एफआायआर दाखल होत नाही. आमचा समाज उठला तर घरातून बाहेर काढणार, हे आम्ही सहन करणार नाही असा इशाराच राजू पाटील यांनी दिला आहे.
मारहाणीच्या घटनेला २२ तास उलटूनही डायगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी जवळपास 7 तास राजू पाटील यांनी पोलिस ठाण्यात होते. गुन्हा दाखल न झाल्याने संतापलेल्या मनसे आमदार राजू पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. कल्याण ग्रामीणमधील मोकाशी पाडा दहीसर मोरी या तीन गावांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांची २८५ एकर शेती आहे. या शेतीवर विकास होणार आहे. या महत्वाच्या जागेवर सर्व बिल्डरांचा डोळा आहे. गुरुवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास काही जण हातात लाठ्या काठ्या घेऊन आले आणि मोकाशी पाड्यातील एकनाथ मोकाशी, त्यांच्या मुलगा प्रशांत मोकाशी यांना बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर महिलांनाही धक्काबुक्की करण्यात आली.
शेतकऱ्यांवरील अन्याय कदापी खपवून घेणार नाही- राजू पाटील
पिडीत कुटुंबाचा आरोप आहे की माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या सहकाऱ्यांनी हा हल्ला केला आहे. हल्लेखोरांचा एक व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. घटना कळताच कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी शेतकरी कुटुंबांना भेटण्यासाठी धाव घेतली. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याने पाटील हे डायघर पोलिस स्टेशनला धाव घेतली. डायघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन गावडे यांची तब्य्येत अचानक बिघडल्याने पोलीस ठाण्यात अन्य अधिकाऱ्यांसोबत राजू पाटील यांनी चर्चा केली. आमदार पाटील हे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गावडे यांच्या दालनात जखमी शेतकऱ्यांना घेऊन बसले. शेतकरी कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. शेतकऱ्यांवरील अन्याय कदापी खपवून घेणार नाही, असा इशाराच त्यांनी दिलाय. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय इथून हालणार नाही अशी भूमिका पाटील यांनी घेतली होती.
stay connected