शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य च्या शेवगाव शाखेच्या वतीने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून शालेय विदयार्थ्यांसाठी 'जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे' आयोजन

 


शेवगाव / अहमदनगर दि ९(प्रतिनिधी): शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य च्या शेवगाव शाखेच्या वतीने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून शालेय विदयार्थ्यांसाठी 'जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शेवगाव शाखाध्यक्ष हरिभाऊ नजन यांनी दिली. इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गातील विदयार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार असून स्पर्धेसाठी १)माझा आवडता कवी २) माझा आवडता स्वातंत्र्यसैनिक 3) ऑनलाईन शिक्षण- फायदे आणि तोटे ४) भारताची गानकोकीळा- लता मंगेशकर ५) मोबाईल-शाप की वरदान ६) एका शेतकऱ्याचे मनोगत असे विषय असून स्पर्धकाने यापैकी एका विषयावर एक हजार शब्दापर्यंत मराठीमध्ये निबंध लिहून तो दि २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत उमेश घेवरीकर, त्रिमूर्ती एजन्सीज, मार्केट यार्ड समोर, नगर रोड, शेवगाव जि. अहमदनगर या पत्यावर पाठवण्याचे आवाहन सचिव सुरेश शेरे यांनी केले आहे.विजेत्यांना २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिनी प्रथम पारितोषिक रुपये एक हजार ,  द्वितीय  रुपये सातशे, तृतीय रुपये पाचशे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र  देण्यात येणार असून रु.दोनशेची पाच उत्तेजनार्थ पारितोषिके विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दिली जाणार असल्याचे उपाध्यक्ष विजय हुसळे यांनी सांगितले.

तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जेष्ठ साहित्यिक विठ्ठल सोनवणे, शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.