जामखेड प्रतिनिधी
पुढची पिढीने शिक्षण घ्यावे व एक सुरक्षित धार्मिक समाज घडावा हा विचार श्री. संत वामनभाऊ महाराज यांनी दिला
आमदार रोहित पवार
_________________________
श्रीसंत वामनभाऊ गड जमदारवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथ गडकर यांच्या काल्याचे किर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली
यावेळी विठ्ठल महाराज म्हणाले की गोरगरीब ऊसतोड मजूरांच्या मुलांचे शिक्षण थांबु नये संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी समाजाचा सर्व भार तर आपण उचलु शकत नाही पण काही विद्यार्थी तयार झाले गरिब कुटुंब सुधारतील या गडाच्या विकासासाठी अमदार रोहित पवार यांनी मदत केली आहे व पुढील काळात जमदारवाडी गडाच्या विकासासाठी मदत करावी असे आव्हान विठ्ठल महाराज यांनी केले
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की संत वामनभाऊ महाराज यांचे काम एका जिल्ह्यापुरते मर्यादित नाही
भाऊंनी सर्व देशभर वारकरी संप्रदाय व शिक्षण या साठी प्रबोधन केले आहे आपली शेती विकावी लागली तरी चालेल पण आपले मुलं शिकली पाहिजे तसेच महाराजांच्या विचारांमध्ये मध्ये मोठी अध्यात्मिक ताकद होती
यावेळी आमदार रोहित पवार यांनी गडाच्या विकासासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला व पुढील काळात गडाच्या विकासासाठी जे जे विकास कामे करायची आहेत ते सर्व मार्गी लावु असा शब्द भाविकांना दिला
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महंत विठ्ठल महाराज, आमदार रोहित पवार यांचा गौरव करण्यात आला
यावेळी बीड जिल्हा परिषदेचे सदस्य सतिष शिंदे,
यांच्या सह पंचकोनीतील भाविक गायक वादक टाळकरी व सप्ताह आयोजन समिती व जमदारवाडी ग्रामस्थ उपस्थित होते
प्रतिनिधी नासीर पठाण सह अशोक वीर जामखेड
stay connected