‘मोदी तेरी हिटलरशाही नही चलेगी‘ - काँग्रेसचे बीड मध्ये आंदोलन

 

‘मोदी तेरी हिटलरशाही नही चलेगी‘ - काँग्रेसचे बीड मध्ये आंदोलन







बीड ( प्रतिनिधी - इरफान पठाण ) -
बीड येथे  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दि . 9 रोजी हे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ तसंच राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. ‘मोदी तेरी हिटलरशाही नही चलेगी‘, राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, झुठा है झुठा है नरेंद्र मोदी झुठा है, ‘माफी माँगो मोदीजी, शर्म करो मोदीजी अशी घोषणाबाजी यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल सोनवणे, नवनाथ थोटे, गणेश बजगुडे,  ईश्‍वर शिंदे, अशोक देशमुख, रवि काका ढोबळे,दत्ता कांबळे, सय्यद फारुख भाई, आसेफ बाबा खतीब, प्रविणकुमार शेप, अमर पाटील, आकाश गायकवाड, संभाजी जाधव, विष्णू मस्के, रंजित कसबे, गोविंद जेधे, आन्वर कुरेशी, रोहित निर्मळ,  अनिल जाधव, महेश बेद्रे, श्रीनिवास बेद्रे, नानासाहेब पवार, गणपत आप्पा कोरे, बहाद्दुरभाई, प्रकाशराव देशमुख, गणेश गंणणे, शिवाजीराव देशमुख, रंजित देशमुख, अशोक कांबळे, धर्मराज खोसे,  सुभाष देशमुख, हनुमान घोडके, इद्रीश हाश्‍मी, संतोष निकाळजे, अविनाथ डरफे यांच्यासह आदि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.2014 च्या निवडणूकीत नरेंद्र मोजी यांनी देशातील 2 कोटी तरुणांना रोजगार देवून महागाई कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र याउलट देशात बेरोजगारांची संख्या वाढली. महागाई गगनाला भिडली. याकडे देशाचे पंतप्रधान मोंदी यांचे लक्ष नसून केवळ जातिवाचक बोलून समाजाची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक कोंडी होवून देश उध्द्वस्ततेकडे जात आहे. हे फार काळ टिकणार नाही. मोदींना महाराष्ट्राचा अवमान करण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान जनता आता सहन करणार नाही. त्यांनी तात्काळ महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागावी असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.