*शेताच्या बांधावरून आ. सुरेश धस यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा*
दौलावडगाव / प्रतिनिधी ...
गेल्या अनेक महिन्यापासून कोरानामहामारीमुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्यानुसार विधान परिषदेचे विद्देमान आमदार सुरेश धस यांनी आपले शुभ चिंतक व कार्यकर्त्यांना अव्हान केले होते की यंदाचा माझ्या वाढदिवसाला कुठलीही गर्दी न करता फक्त शुभेच्छा देऊन साजरा करण्यात यावा त्यास अनुसरून आष्टी तालुक्यातील बांदखेल येथिल शेतकरी पुञ अर्जून थोरात यांनी आपल्या शेतात कांद्यापासून रांगोळी काढून आपल्या लाडक्या नेत्याचे २ फेब्रुवारी रोजी आ. सुरेश आण्णा धस यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला. असंख्य कार्यकर्त्यांनी विविध पध्दतीने अण्णांना शुभेच्छा दिल्या. पण बांदखेल येथील अण्णांचे कट्टर कार्यकर्ते शेतकरीपुत्र. अर्जुन थोरात यांनी आपल्या शेतातील कांद्यापासून रांगोळी काढत, थेट शेताच्या बांधवरून आ. धस यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.त्याबद्दल त्यांची गावभर कौतुक तर होत आहे तर तालुक्यात ही चर्चा आहे.
stay connected