सरपंच देविदास उदावंत यांना मातृशोक

सरपंच देविदास उदावंत यांना मातृशोक



आष्टी तालुक्यातील धानोरा गावचे सरपंच देविदास हरिश्चंद्र उदावंत यांच्या मातोश्री रुक्मिणी हरिश्‍चंद्र उदावंत यांचे अल्प आजाराने  १ फेब्रुवारी २०२२ मंगळवार रोजी सकाळी ६ च्या दरम्यान वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत होत्या. यांच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, असा परिवार आहे . त्यांचा अंत्यविधी धानोरा येथील अमरधाम मध्ये मंगळवारी दुपारी २ वाजता करण्यात आला . याप्रसंगी माजी आमदार साहेबराव दरेकर , आष्टी पंचायत समितीचे सदस्य परमेश्वर काका शेळके,  माजी सभापती अंकुश चव्हाण, नामदेव शेळके, उपसरपंच सय्यद युनूस , राम  शेळके, माजी सरपंच राजाभाऊ शेळके, अब्दुल भाई सय्यद तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील  मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.