पत्रकार रहेमान सय्यद यांना लोकशाही रक्षक पुरस्कार २०२२

 पत्रकार रहेमान सय्यद यांना लोकशाही रक्षक पुरस्कार २०२२



 संदिप जाधव / कडा

कडा येथील पत्रकार सय्यद रहेमान सय्यदअली यांना बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य तर्फे लोकशाही रक्षक पुरस्कार २०२२ देऊन गौरवण्यात आले.

  लहान मुलांच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवण्याच्या हेतूने बाल हक्क संरक्षण संघाचे उद् घाटन व बाल हक्कांसाठी लढणाऱ्या किलबिल न्युजचा लोकार्पण सोहळा पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे पार पडला.या सोहळ्यात पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल रहेमान सय्यद यांना लोकशाही रक्षक पुरस्कार २०२२ महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सदस्या प्रोफ.आस्मा शेख,डाँ.विजया वांजपे,डाँ.लक्ष्मण दानवाडे,जयश्री मोघे,शशिकांत सावरकर,पुणे म.न.पा. च्या महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षा रूपाली धाडवे,जि.प.च्या महिला व बाल कल्याण समितीचे सभापती पूजा पारगे,छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक राम घयतिडक सह बाल हक्क संरक्षण संघाचे पुणे अध्यक्ष हर्षल पटवारी,कार्याध्यक्षा शितल हुलावले,सरचिटणीस ज्ञानदेव इंगळे,उपाध्यक्ष तथा प्रहारचे रूग्णसेवक नयन पुजारी,सर्व सदस्य,असरार सय्यद,सुरेश तारू सह आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन हर्षल पटवारी व ज्ञानदेव इंगळे यांनी केले होते. तर सूत्र संचालन राजू दवने,आभार व प्रदर्शन डाँ.भालचंद्र कदम यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.