प्रशासनाच्या निष्काळजी मुळे नवीन लागवड केलेली झाडे जाळून खाक
कर्जत तालुक्यातील कुळधरण- धालवडी मार्गाच्या दुतर्फा नव्याने लागवड करण्यात आलेली रोपे जळून खाक झाली आहेत. वणवा लागून वनक्षेत्राची हानी होवू म्हणून तालुक्यात वनक्षेत्र असलेल्या पुणे वन्यजीव विभागाकडून जाळरेषा केली जाते. मात्र विभागातील कर्मचाऱ्यांनी लागवड केलेल्या क्षेत्राची काळजी न घेता भरदुपारीच ते पेटवून दिल्याने या आगीत शेकडो रोपे जळून खाक झाली आहेत.
सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून रस्ता दुतर्फा रोपांची लागवड करून त्याचे संगोपन केलेले आहे. मात्र योग्य नियोजनाच्या अभावी सलग दुसऱ्या वर्षी या भागात लागवड केलेली रोपे जळून खाक झाली आहेत. शासनाकडून वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे.
मात्र अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांच्या कामावर नियंत्रण राहिले नसल्याने येथे पर्यावरणाची मोठी हानी झालेली आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. हलगर्जीपणामुळे शेकडो रोपे जळून खाक झाल्याने पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
----
प्रतिनिधी अस्लम पठाण कर्जत अहमदनगर
stay connected