शेवगाव तालुका प्रतिनिधी प्रविण भिसे
अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी गुरुनाथ माळवदे यांचा निवडीबद्दल सत्कार समारंभ दहिगाव ने येथे पार पडला
भारतीय जनता पार्टी चे जिल्हा चिटणीस बशीर भाई पठाण यांनी सत्कार समारंभ दहिगाव ने येथे आयोजित केला होता
भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान एकनिष्ठ गुरुनाथ माळवदे यांची अहमदनगर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा दहिगावने येथे सत्कार करण्यात आला यावेळी गुरुनाथ माळवदे यांनी सांगितले की अहमदनगर येथे उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रविजी अनासपुरे व शिवाजीराव कर्डीले मोनिकाताई राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर प्रभारी लक्ष्मनजी सावजी साहेब तसेच मा.जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ मुंढे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व रामजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी ने माझ्यावर हि मोठी जबाबदारी दिली आहे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून साधारणता बुथ प्रमुख शक्ती प्रमुख तालुका उपाध्यक्ष व ढोरसडे गावचे सरपंच पद पाच वर्षे सांभाळून या सर्वांचा अनुभव घेऊन मला पक्षाने जि संधी दिली आहे त्या संधीचे नक्कीच पक्षाचे ध्येय धोरणे व पक्षाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीन व सर्व सामान्य जनतेच्या कामाला येईल तसेच पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास हि सार्थ करीन व माझ्यावर प्रेम करणारा तळागाळातील कार्यकर्ता व सर्व नागरिकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे सांगितले त्यानंतर काही प्रमुख मान्यवरांचा देखील सन्मान करण्यात आला त्यांची नावे पुढील प्रमाणे. बाळासाहेब विखे,पांडुरंग निकम, सुभाष वाघमारे, सतीश माळवदे, बाळासाहेब भिसे बुथ प्रमुख दहिगावने, देविदास माळवदे, मेजर सर्जेराव घानमोडे, मेजर हरिभाऊ पाठे ,मेजर दत्तात्रय काशीद, स्वाभिमानी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर, याकुब शेख पैलवान, बाबासाहेब घाणमोडे, रमेश मतकर, आप्पासाहेब सुकासे, जगदाळे पाटील, पत्रकार नवनाथ कोकाटे, भारत देशमुख, बशीर भाई पठाण जिल्हा चिटणीस, वसंत दळवी, अमोल काटे, पत्रकार व स्वाभिमानी मराठा महासंघाचे तालुका युवा कार्याध्यक्ष व भारतीय जनता पार्टी चे दहीगाव ने चे बुथ प्रमुख प्रवीण भिसे आदी उपस्थित होते
stay connected