नगर - आष्टी रेल्वे उदघाटनाला मुहूर्त सापडेना ' उदघाटन लांबणी वर पडल्याने आष्टीकरांचा अपेक्षाभंग
अहमदनगर (प्रतिनिधी ) -
नगर-आष्टी दरम्यान नव्याने सुरुवात होणारी रेल्वे 4 फेब्रुवारी रोजी सुरु होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र हे उद्घाटन तूर्तास होणार नसल्याचे सोलापूर रेल्वे विभागाच्या जनसंपर्क अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आष्टीकरांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत.
नगर ते आष्टी दरम्यान दिनांक 3 किंवा 4 फेब्रुवारी रोजी रेल्वे सुरु होणार असल्याचे रेल्वे सूत्रांचे म्हणणे होते. त्यासाठी रेल्वे निर्माण विभागाच्या वतीने जोरदार तयारी सुरु आहे. मात्र या रेल्वेचा प्रारंभ वरिष्ठ पातळीवरून होणार असल्याने अद्याप तसा कार्यक्रम जाहीर झाला नसल्याचे रेल्वे विभागाच्या सोलापूर जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांचा अपेक्षा भंग झाला आहे. हे उद्घाटन आता केव्हा होणार हे मात्र स्पष्ट झाले नाही .
Https://cmnews.co.in
उत्तर द्याहटवाstay connected