जलसिंचन विहीर ,शेततलावाचे उद्दिष्टे पूर्ण: शेतकऱ्यांनी नवीन प्रस्ताव दाखल करू नयेत ----गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे

 जलसिंचन विहीर ,शेततलावाचे उद्दिष्टे पूर्ण: शेतकऱ्यांनी नवीन प्रस्ताव दाखल करू नयेत 

----गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे

**************************



**************************

आष्टी(प्रतिनिधी)

तालुक्यातील पंचायत समिती च्या मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या जलसिंचन विहीर व शेततलाव यांचे कामे यावर्षीचे उद्दीष्ट्ये पुर्ण झाले असून,आता २०२२-२३ चे उद्दिष्टे आल्यानंतरच पुढील कामांचे प्रस्ताव घेण्यात येतील.त्यामुळे तालुक्यातील कोणत्याही शेतक-यांनी आता विहीरीचे प्रस्ताव दाखल करू नये असे आवाहन गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी केले.

           आष्टी येथील पंचायत समिती सभागृृृृहात गुरूवार दि.१० रोजी सांयकाळी ५ वा.गटविकास अधिकारी यांच्या पंचायत समिती सभागृृृृहात पञकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

पुढे बोलतांना मुंडे म्हणाले,आष्टी तालुक्यात सन २०२१-२२ चे मनरेगा अंतर्गत एकूण १३५० जलसिंचन विहीरी तर ६८० शेत तलावाचे उद्दीष्ट्ये देण्यात आले होते. गेल्या वर्षभरात हे सर्व उद्दिष्टे पुर्ण झाले असून,

आज घडीला तालुक्यात १३५० पैकी जवळपास ७०० जलसिंचन विहीरी व ६८० शेततलावापैकी २४० कामे सुरू असून सर्व मंजूर विहिरीचे व शेततळ्याचे कामे ३१ मार्च २०२२ पर्यंत पुर्ण करण्यात येणार असल्याचे आदेश संबंधीत यंञणेला देण्यात आले आहेत.यासंबंधीत सभापती, अधिकारी,मनरेगा विभागाच्या प्रमुखांची बैठक घेतली घेऊन आदेशीत केले आहे. त्यामुळे आता शेतक-यांनी नवीन विहिरी व शेततळ्यांचे प्रस्ताव आता दाखल न करता पुढील वर्षाचे उद्दीष्ट्ये आल्यानंतरच हे प्रस्ताव दाखल करावेत असे आवाहनही गटविकास अधिकारी मुंडे यांनी केले.



***********

***********************

शेतकऱ्यांनी अमिशाला बळी पडू नये

----- बद्रीनाथ जगताप 

***********************



**************************


दरम्यान तालुक्यातील मनरेगा अंतर्गंत सुरू असलेले कामांचे उद्दीष्ट्ये पुर्ण झाले आहेत तरी देखील तालुक्यातील गावागावात काही शेतकऱ्यांकडून विहीरी मंजूर करण्यासाठी पैसे गोळा केले जात असून प्रस्ताव दाखल करू असे सांगण्यात येत आहे.त्यामुळे प्रस्ताव दाखल करण्यासाठी कसलेही पैसे लागत नसून,सध्या विहीरीचे उद्दीष्ट्ये नसल्यामुळे कोणत्याही शेतक-यांनी पैसे देऊ नये कोणाच्याही अमिशाला बळी पडू नये असे आवाहन पंचायत समिती सभापती बद्रीनाथ जगताप यांनी केले आहे.




*********

पंचायत समितीत गर्दी करू नये-मुंडे

********************

सध्या तालुक्यातील मग्रायोजनेतुन कामे सुरू असून, त्या कामांचे हजरीपत्रक दाखल करण्यासाठी शेतकरी पंचायत समितीत येत असून गर्दी करीत आहेत.लाभार्य्थ्यांनी हजरीपत्रक (मस्टर)आपआपल्या गावातील ग्रामसेवक,ग्रामरोजगार व सरपंच यांच्याकडेच दाखल करावेत तसे त्यांना आदेशीत केले असून पंचायत समिती कार्यालयात येण्याची गरज नाही.लाभार्थी

-सुधाकर मुंडे

गटविकास अधिकारी आष्टी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.