प्रा. किसन शिनगारे यांना समाजकार्य विषयात पीएच. डी पदवी

 प्रा. किसन शिनगारे यांना समाजकार्य विषयात पीएच. डी पदवी



अंबाजोगाई/प्रतिनिधी

मानवलोक समाजकार्य महाविद्यालय अंबाजोगाई येथील प्राध्यापक किसन शिनगारे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने समाजकार्य या विषयात पीएचडी प्रदान केली. त्यांनी प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉब्लेम ऑफ स्टुडंट बिलॉगिन टू धनगर कम्युनिटी अँड नेसेसरी इंटर्वेंशन या विषयात संशोधन प्रबंध सादर केला. प्रोफेसर डॉ. सतीश दांगडे लोकप्रशासन विभाग प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मौखिक परीक्षेत प्राध्यापक किसन शिनगारे यांनी संशोधन विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली . यावेळी बहिस्थ परीक्षक म्हणून डॉ. मेघराज कपूरडेरिया सहयोगी प्राध्यापक नांदेड यांनी काम पाहिले . प्रा किसन शिनगारे यांचे पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने अनिकेत लोहिया ( कार्यवाह मानवलोक ) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी लालासाहेब आगळे ( सहकार्यवाह मानवलोक )  प्रा. डॉ. नजीर शेख, प्रा. अरुंधती पाटील, प्रा. डॉ. रमा पांडे, प्रा. सुकेसिनी जोगदंड , प्रा. डॉ. हनुमंत साळुंखे, डॉ. वनिता माचवे, अशोक केदार, बिबीशन घाडगे, रामदास काळे तसेच सर्व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.