नालासोपाऱ्यात राजस्थानहुन आणलेले पाच कोटींचे हिरॉईन जप्त,
दोन आरोपींना अटक...?
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.६ वसई(ठाणे) : राजस्थानहून मुंबईत विक्रीसाठी आणलेले 5 कोटींचे हिरॉईन नालासोपाऱ्यातील पेल्हार परिसरातून मुंबई जुहू आणि ठाणे युनिटच्या दहशतवादी विरोधी पथकाने ४ फेब्रुवारी रोजी संयुक्त कारवाई करीत जप्त केले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आलीम मोहम्मद आक्तर (४६), छोटा मोहम्मद नासिर (४०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींविरोधात दहशतवाद विरोधी पथक मुंबई ठाणे पोलीस ठाण्यात कलम ८ (क), २१ (क), २९ अंमलीपदार्थ विरोधी कायदा १९८५ अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नवीन बुटाची जोडी घेऊन, बुटाचे सोल आतून कापून, त्यामध्ये निर्माण झालेल्या जागेमध्ये, अंमलीपदार्थ ठेवून, सदर बुटाची जोडी त्याच्या हस्तकामार्फत राजस्थानमधून मुंबईत पाठवले जात होते.
नालासोपाऱ्यातील पेल्हार गावातून आरोपी करीत होते धंदा
वसई तालुक्यातील नालासोपाऱ्यात पेल्हार गावात एका भाड्याच्या रुममध्ये राहून ही टोळी अंमली पदार्थांचा धंदा करीत होती. राजस्थानहून हिरॉईन आणून ही टोळी मुंबईत त्याची विक्री करीत होती. दहशताद विरोधी पथकाला हिरॉईनची विक्रीची माहिती मिळाली होती. त्यानुसार महाराष्ट्र दहशवाद विरोधी पथक आणि ठाणे दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करीत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अटक आरोपींकडून ५ कोटी १७ लाख रुपये किंमतीचे १ हजार ७२४ ग्रॅम हिरॉईन जप्त करण्यात आले. तसेच २ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाईल फोन व अंमली पदार्थ विक्रीसाठी लागणारे काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी मूळचे उत्तराखंड राज्यातील हरिद्वार जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक प्रमुख विनीत अग्रवाल, पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सिध्देश्वर गोवे, यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या जुहू युनिटचे प्रभारी ज्ञानेश्वर वाघ, एपीआय दशरथ विटकर, सचिन पाटील व ठाणे दहशतवाद विरोधी पथकाचे अविनाश कवठेकर, संजीव भोसले यांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून शुक्रवारी छापा मारून अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
stay connected