*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या केज तालुकाध्यक्ष पदी रंजीत घाडगे सचिव पदी अनिल वैरागी तर कार्याध्यक्ष पदी नवनाथ पौळ यांची निवड.*
केज (प्रतिनिधी) दि.७ रोजी शासकीय विश्रामगृह बीड येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी बैठक पार पडली. या बैठकीला पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रामनाथ कांबळे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक दशरथ रोडे सर तसेच प्रदेश संघटक भागवत वैद्य सर व जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार धिवार यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृह बीड या ठिकाणी नवनियुक्त तालुका कार्यकारिणीची बैठक पार पडली. यामध्ये केज तालुक्याची नवनियुक्त कार्यकारणी करण्यात आली कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या केज तालुकाध्यक्षपदी रंजीत घाडगे यांची तर सचिवपदी अनिल वैरागे व कार्याध्यक्षपदी नवनाथ पौळ यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे सर्व तालक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.
stay connected