*आकाश गरुड याने ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वेटलिफ्टिंग मेन चॅम्पियनशिप 2022 - 2023 स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त झाल्याने पुर्णा रेल्वे स्थानकावर सत्कार..!*
--------------
*रेल्वे बुकिंग सुपरवाजर राम शिंदे यांच्या वतीने पुर्णा रेल्वे स्थानकावर सुवर्ण पदक विजेते आकाश गरूड लातुरकर सह सर्व खेळाडूंचा भव्य सत्कार...!*
--------------------
*आष्टी (प्रतिनिधी)*
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी चंदिगढ येथे अखिल भारतीय अंतर महाविद्यालयीन क्रिडा स्पर्धेत आयोजित वेट लिफ्टींग स्पर्धेमध्ये नांदेड येथील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता त्यातील एका खेळाडूने सुवर्ण पदक प्राप्त केल्याने त्या खेळाडूचे अभिनंदन रेल्वे बुकिंग सुपरवाजर राम शिंदे यांच्या वतीने पुर्णा रेल्वे स्थानावर चंदीगड येथून विजय झालेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यापीठाच्या वतीने चंदिगढ येथे 13 मार्च ते 19 मार्च पर्यंत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय अंतर महाविद्यालयीन क्रिडा स्पर्धे अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामधील ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील अनेक खेळाडू उपस्थीत झाले होते या स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील आकाश गरुड, आशुतोष लक्ष्मण शिंदे,कृष्णा दळवी कुमार मगर, यश हलके, दुर्गेश सुर्यवंशी, शुभम श्रीनिवास या खेळाडूंसह टिम व्यवस्थापक सतीश बरकुंटे यांची ही उपस्थिती होती हे सर्व खेळाडू निवासी पूर्णा येथील असून या खेळाडूंनी विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत खेळाडूंनी आपली नांदेड ची यशाची परंपरा आपल्या खेळातून सिद्ध करून दाखविली आहे यामध्ये आकाश गरुड याने ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वेटलिफ्टिंग मेन चॅम्पियनशिप 2022 - 2023 स्पर्धेमध्ये विजेता झाल्याने सुवर्ण पदक देऊन त्यास गौरविण्यात आल्याने इतर खेळाडूसह सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्याचे चंदिगढ वरून रेल्वे ने हे सर्व खेळाडू पूर्णा रेल्व स्थानकावर परत येताच पूर्णा येथे भोकर येथील रेल्वे बुकिंग सूपरवायजर राम शिंदे,सिद्धांत राम शिंदे,श्याम शिंदे,विलास शिंदे,रमेश बरकुंटे,माजी नगरसेवक आशीष ठाकूर आदींनी सर्व खेळाडूसह टीम व्यवसथापकाचे पुष्पहार घालून अभिनंदन केले आहे.
stay connected