कडा कृषी उत्पन्न बाजार समिती2023 निवडणुक जाहीर .

 कडा कृषी उत्पन्न बाजार समिती2023 निवडणुक जाहीर .




कडा / प्रतिनिधी .


आष्टी तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी कृषी उत्पन्न बाजार समिती समजली जाणारी कडा कृषी उत्पन्न बाजार समिती 2023 ची निवडणुक जाहीर झाली असुन .

कडा कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजार समीतीचा कार्यकाळ संपला असुन 18जागेसाठी निवडणुक प्रक्रिया होणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया हि 27मार्च 2023पासुन सुरु होणार आहे.

अनेक दिवसांपासून पुढे ढकलत चाललेल्या कडा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्रम आता जाहीर झाला असुन गेल्या अनेक वर्षापासुन विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात असलेली कडा कृषी उत्पन्न बाजार समिती होती यंदा २०23 भाजपचे आमदार भिमराव धोंडे व आमदार सुरेश धस हे आपआपले प्रतिस्पर्धी निवडणुक एकत्र लढवणार की वेगवेगळे पॅनल टाकणार याबाबत चर्चा सुरु आहे 

तसेच राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आपला पॅनल टाकणार असल्याचे चिन्ह दिसत आहे .

निवडणुक प्रक्रिया कार्यक्रम पुढील प्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करणार 27 मार्च ते 3 एप्रिल 2023 तर उमेदवारी अर्जाची छाननी ही 5 एप्रिल 2023 अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया असुन6 एप्रिल ते20 एप्रिल 2023 च्या दरम्यान असणार आहे .

21 एप्रिल 2023 रोजी उमेदवारां ना चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे 28 एप्रिल2023 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे 29 एप्रिल 2023 मतमोजनी ला सुरवात होऊन निकाल जाहीर होणार अशी माहीती कृषी उत्पन बाजार समितीचे राज्य निवडणुक आयुक्त बी . जी . शिंदे . यानी ही माहीती दिली आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.