25 मार्च रोजी महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची शक्यता - पंजाबराव डख
पंजाबरावांच्या मते, आज आणि उद्या म्हणजेच 25 मार्च रोजी महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची शक्यता आहे. प्रामुख्याने पूर्व विदर्भात ढगाळ हवामान राहणार आहे. या दरम्यान मात्र राज्यात पाऊस पडणार नसल्याचे मत पंजाबरावांनी व्यक्त केलं आहे.
याशिवाय डखं यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा हवामान मोठ्या प्रमाणात बदलणार असून 5 एप्रिल पासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे. निश्चितच डक यांचा हा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे राहणार आहे.
stay connected