डिजिटल मीडिया परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची 27 मार्चला बीड येथे जिल्हास्तरीय बैठक

 डिजिटल मीडिया परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची
27 मार्चला बीड येथे जिल्हास्तरीय बैठक



बीड ( प्रतिनिधी ) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी सलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेची बीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची दिनांक 27 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह, बीड येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

     अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कर्जत जिल्हा अहमदनगर येथे दि 7 एप्रिल रोजी राज्यस्तरीय मेळावा आणि पत्रकार पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यातील डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची दिनांक 27 मार्च 2023 रोजी, सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह बीड येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल वाघमारे हे मार्गदर्शन करणार असून, अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिरसाट तर डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डिजिटल मीडिया परिषदेचे तालुका व जिल्हास्तरावरील कार्य आणि नियोजन, यासोबतच कर्जत येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मेळाव्या बाबत या बैठकीत पुढील नियोजन ठरविण्यात येणार आहे. तरी डिजिटल मीडियाच्या सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असेच आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक कांबळे, विश्वंभर मुळे आणि संग्राम धनवे यांनी केले आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.