शेतकरीपुत्रांनो 27 मार्चला शेतकऱ्याच्या रूमनं मोर्चात रूमनं घेऊन या! -प्रा.अण्णासाहेब राऊत --------------------------- सोशल मीडियावर शेतकऱ्यांबद्दल तळमळ दाखवणारे मोर्चा येतील का?

 शेतकरीपुत्रांनो 27 मार्चला शेतकऱ्याच्या रूमनं मोर्चात रूमनं घेऊन या!
-प्रा.अण्णासाहेब राऊत
---------------------------
सोशल मीडियावर शेतकऱ्यांबद्दल तळमळ दाखवणारे मोर्चा येतील का?

---------------------------



 बीड(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आम आदमी पार्टी बीडच्या वतीने शेतकऱ्यांची एकजूट करून  शेतीमालाला योग्य भाव, पिक कर्ज ,पिक विमा, नुकसान भरपाई,वीज दरवाढ,खतांची दरवाढ, बी बियाणांची दरवाढ, शेतीसाठी पाणी, शेती पूरक व्यवसाय वृद्धी व अनुदान या विषयांना घेऊन रूमनं मोर्चा काढण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या बद्दल तळमळ असणारे, सर्व शेतकरीपुत्र, सर्व शेतकरी संघटना अधिकारी व पदाधिकारी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक,व्हाट्सअप,ट्विटर, इंस्टाग्राम किंवा टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्याची भूमिका न मांडता थेट जिल्हा कचेरीवर येऊन आपल्या शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी निघणाऱ्या शेतकऱ्यांच्या दिनांक 27 मार्च 2023 वार-सोमवार वेळ सकाळी 10:30वाजता च्या रुमणं मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान आम आदमी पार्टीचे जिल्हासंघटनमंत्री- शेतकरी कवी. प्रा.ज्ञानेश्वर (अण्णा) राऊत प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे हा मोर्चा

छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून निघणार असून जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे जाऊन थांबणार आहे. हा मोर्चा आम आदमी पार्टीची जिल्हाध्यक्ष अशोक खेडे साहेब जिल्हासचिव रामधन जमाले साहेब शहरप्रमुख सय्यद सादिक भाई जिल्हाउपाध्यक्ष अक्रम भाई जिल्हा मीडिया प्रमुख रामभाऊ शेरकर जिल्हा कोषाध्यक्ष कैलास पालीवाल, मिलिंद पाळणे, अझम खान, विनोद पाटील, देवा गुंजाळ तालुकाध्यक्ष भीमराव कुटे तालुकासंघटनमंत्री दत्ता सुरवसे युवाजिल्हासंघटनमंत्री प्रवीण पवार, दादासाहेब सोनवणे, नागरगोजे मामा, जामकर मामा यांच्या नियोजनात होणार आहे त्याचबरोबर सर्व तालुक्याचे तालुकाध्यक्ष आपल्या तालुक्याच्या टीम ला घेऊन या मोर्चात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या मोर्चासाठी आम आदमी पार्टीचे राज्य अध्यक्ष माननीय रंगा दादा राजुरे यांची उपस्थिती असणार आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.