जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणुक जाहिर 34 जागेसाठी 6 मे रोजी मतदान,12 वर्षाचा वनवास संपला-प्रदिप खाडे

 जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणुक जाहिर 
34 जागेसाठी 6 मे रोजी मतदान,12 वर्षाचा वनवास संपला-प्रदिप खाडे



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

 परळी शहरातील नावाजलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीची अखेर 12 वर्षानंतर निवडणुक जाहिर झाली.निवडणुक अधिकारी द.ल.सावंत यांनी 34 जागेसाठी निवडणुक कार्यक्रम जाहिर केला.दि.6 मे रोजी निवडणुक तर 7 मे रोजी निकाल जाहिर होणार आहे.या शिक्षण संस्थेची निवडणुक घेण्यात यावी यासाठी प्रदिप खाडे यांनी न्यायालयीन लढा लढल्यानंतर धर्मादाय उपायुक्त यांनी 31 मे पर्यंत निवडणुक घेण्याचे आदेश दिले होते.  

  जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणुक बारा वर्षापुर्वी झाली होती. 2009 पासून 468 जणांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी  सभासदाची न्यायलयीन लढाई सुरु होती.माजी मंत्री आ.धनंजय मुंडे व प्रा. सदाशिव मुंडे, पंडितराव दौड, उत्तमराव देशमुख, भास्कर मामा चाटे,कुंडलिकराव मुंडे, डॉ. पी. एल. कराड, सुरेश (नाना) फड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप खाडे यांनी बीड येथील सहधर्मादाय आयुक्ताकडे न्यायलयीन लढा सुरू केला होता.यात प्रदीप खाडे यांचा 41(अ) चा अर्ज वैद्य ठरवून जवाहर एजयुकेशनची निवडणुक घेण्याचे आदेश देत निवडणुक अधिकारी म्हणुन द.ल.सावंत यांची नियुक्ती केल्यानंतर सावंत यांनी निवडणुक कार्यक्रम जाहिर केला यात तहहयात सभासदांतुन 31,आश्रयदाता सभासदांतुन 1,हितचिंतक 1 व सहाय्यक सभासदातुन 1 असे 34 संचालक निवडले जाणार आहेत.प्राथमिक सभासद यादी प्रसिध्द करणे 5 एप्रिल,सभासद यादीस हरकत घेण्याची अंतिम तारीख 8 एप्रिल, हरकत अर्जाची छाननी पडताळणी 9 एप्रिल,हरकत अजविरील छाननीअंती निकाल 11 एप्रिल,अंतिम सभासद यादी प्रसिद्ध करणे 12 एप्रिल,उमेदवारी नामांकन पत्र देणे 13 एप्रिल,उमेदवारी नामांकनपत्र स्विकारणे 15 एप्रिल, उमेदवारी नामांकनपत्र छाननी 17 एप्रिल,उमेदवारी नामांकन पत्र परत घेणे 19 एप्रिल,अंतिम उमेदवारी प्रसिध्दी व चिन्ह वाटप 20 एप्रिल रोजी होणार आहे.यानंतर गरज पडल्यास दि.6 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान आणी दि.7 मे रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. बारा वर्षापुर्वी आ.धनंजय मुंडे साहेब जवाहर एज्युकेशन सोसायटीवर असावेत अशी इच्छा स्व.पंडितअण्णा मुंडे यांनी बोलुन दाखविली होती.त्यानंतर आम्ही 12 वर्षे न्यायालयीन लढाई लढली आज  आम्हाला यश प्राप्त झाले असुन आ.धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जवाहर एज्युकेशन सोसायटी शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय लिहिणार असुन स्व.पंडितअण्णा मुंडे यांचे स्वप्न पुर्ण करता आले याचे समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया अर्जदार प्रदिप खाडे यांनी व्यक्त केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.