कांदा व रेशन अनूदानासाठी लागणारे 7/12 उतारे सज्जावर मिळतील का? शेख अजिमोद्दीन

 कांदा व रेशन अनूदानासाठी लागणारे 7/12 उतारे सज्जावर मिळतील का? शेख अजिमोद्दीन



. महाराष्ट्र शासनाने कांदा अनूदान 350 रूपये देण्याचे घोषित केले व तसे परिपत्रक दिनांक 27/3/2023रोजी पारीत केले आहे . तसेच शेतकऱ्यांना रेशनिंग धान्य ऐवजीं थेट रक्कम खात्यावर जमा  होणारआहे त्याकरिता शेतकऱ्यांना 7/12ऊतारा आवश्यक आहे.आष्टी तालुका प्रामुख्याने कांदा उत्पादक आहे .कांद्याचे दर पडले म्हणून राज्य सरकारने प्रती क्विंटल 350रूपये अनूदान शेतकऱ्यांना दिलासा म्हणून दिले जाणार आहे . रेशनींगसाठी व कांदा अनूदानासाठी 7/12ऊतारा आवश्यक आहे तरी आष्टीचे तहसीलदार यांनी सर्वप्रथम तलाठ्यांना सज्जवर हजर राहण्याचे आदेश दिले पाहिजे कारण एकाही सज्जावर तलाठी हजर राहत नाहीत ते कडा,धानोरा आष्टी येथे कार्यालय थाटून बसले आहेत .पिम्पळा सज्जाची तर गोष्टच न्यारी.7/10/2021पासून पिम्पळा सज्जवर तलाठी महोदय येतच नाहीत त्यांची तक्रार मूख्य मंत्री , उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांचेकडे करूनही तलाठी सज्जावर आजतागायत हजर नाही ते धानोरा येथून कारभार पहात आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी राधाबेन शर्मा यांनी दोन वेळेस शेतकर्यांसमोर निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना  या तलाठ्याला निलंबीत करण्यात यावे सांगितले होते परंतू अद्याप कार्यवाही झाली नाही किंवा तलाठी पिंम्पळा सज्जावर आलेले नाहीत.या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर तालूक्यात काय परीस्थिती आहे हे लक्षात येते. याकरीता मी शेख अजिमोद्दीन  शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष बीड या पत्रकाद्वारे जाहीर आव्हान करितो कि आष्टीचे तहसीलदार विनोद गूंडमवार यांनी तालुक्यातील सर्वच तलाठ्यांनी सज्जावर हजर राहून शेतकरयांना 7/12ऊतारे देण्यासाठी सक्तीचे आदेश देण्यात यावेत .जर कोणी शेतकरी 7/12ऊतारा न मिळाल्याने वंचित राहीला तर त्याची जबाबदारी संपूर्णपणे आपली राहील . 1एप्रील पासून तलाठी सज्जवर हजर नाही राहीले तर आपल्या कार्यालयासमोर शेतकरी संघटना मार्फत रितसर निवेदन देऊन बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल.तरी तहसीलदार यांनी या जाहीर प्रसिध्दी पत्रकाची दखल घ्यावी असे आवाहन शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.