*आम आदमी पार्टीचा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रूमणे मोर्चा*
-----------------------------------
बीड जिल्ह्य मध्ये पाठीमागील आठ दिवसात अवकाळी गारपीट मोठ्या प्रमाणात झाली आहे . शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अद्याप कसल्याही प्रकारची शासनाच्या वतीने दखल घेण्यात आलेली नाही . शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे हाता तोंडाला आलेले पीक फळबागे ,आंबा, संत्रा ,अंगूर ,खरबूज ,चिंच, गहू, जवारी ,हरभरा यासारख्या पिकांचे नुकसान झालेले असताना देखील कसल्याही प्रकारचा एकही पंचनामा बीड जिल्ह्या मध्ये झालेला नाही . आपण आपली यंत्रणा कामाला लावून तात्काळ पंचनामे करून घ्यावे शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचावी महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन जो महाराष्ट्रातील जनतेवरती वाढीव वीजदर लागू केला आहे , तो महाराष्ट्रातील नागरिकांवर अन्यायकारक असून तो तात्काळ मागे घ्यावा शेतकऱ्यांचे वाढलेले खताचे भाव कमी करण्यात यावेत शेतमालाला भाव कसलाही नसताना फक्त आणि फक्त व्यापाऱ्यांना व मोठमोठ्या भांडवलदारांना फायदा पोहोचवण्यासाठी ही खताची वाढ झालेली असून ही वाढ तात्काळ वापस घ्यावी शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे माल घरात पडून आहेत , कापूस सोयाबीन या पिकांना सरकारने बोनस जाहीर करावे व बीड जिल्ह्य मध्ये पाठीमागे मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठवाड्यातील जिल्ह्यासाठी आपल्या सरकारच्या वतीने वाटर ग्रिड योजना राबवू असे आश्वासन मराठवाड्यासाठी सरकारच्या वतीने देण्यात आले होते . त्यावरती आपण कसल्याही प्रकारचे काम केले गेले नाही ते तात्काळ सुरू करण्यात यावे व मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावा या विविध मागण्या घेऊन आम आदमी पार्टी येणाऱ्या २७ मार्च शुक्रवार रोजी10.30 छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी व प्रश्नांची आठवण करून देण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे . सरकारने हे प्रश्न मार्गी न लावताच
*प्रमुख मागण्या*
जिल्ह्यात गारपिटीने झालेल्या नुकसान तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी
महाराष्ट्र सरकारने वाढवलेले विद्युत बिल तात्काळ माघार घ्यावी व विद्युत कंपन्यांचे ऑडिट करूनच पुढील बिलामध्ये सुधारणा करण्यात यावी
मराठवाड्यातील वॉटर ग्रीन योजना जी घोषित करण्यात आली होती त्या योजनेवर तात्काळ काम करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था करण्यात यावी
खते बियाणे व शेतकऱ्यातील कृषी यंत्रे यावरील वाढलेले दर वापस घ्यावे व सबसिडी वाढवून मागेल त्या शेतकऱ्याला यंत्र उपलब्ध देण्यात यावे
शेतीमालाचे भाव पडले असल्यामुळे घरामध्ये पडून आहे शेतकरी हा अडचणीत आलेला आहे त्याला त्यावरती अनुदान राशी घोषित करण्यात यावे
गारपिटीमुळे फळबागांचे आंबा, मोसंबी ,संत्रा, चिंच, केळी गहू ,हरभरा ,जवारी यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना मदत तात्काळ देण्यात यावी आशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले यावेळी माजी सैनिक अशोक येडे. जिल्हाध्यक्ष सय्यद सादेक शहराध्यक्ष भीमराव कुठे तालुकाध्यक्ष दादासाहेब सोनवणे पिंपळनेर सर्कल प्रमुख दत्ता सुरवसे सर्कल प्रमुख रामेश्वर जी गव्हाणे नागरगोजे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
stay connected