आनंदाचा सोहळा नाकारत... सुरेश पाटोळे थेट गारपीटग्रस्तांच्या मदतीला.

 आनंदाचा सोहळा नाकारत... सुरेश पाटोळे थेट गारपीटग्रस्तांच्या मदतीला.



शिरूर (का.) / प्रतिनिधी

      सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांचा दरवर्षी २० मार्च रोजी वाढदिवस असतो. मात्र बीड जिल्ह्यांतील विशेषतः शिरूर-कासार तालुक्यांतील पिंपळनेर, रुपुर, गोमळवाडा, कोळवाडी, खांबसवाडी, वडळी, सावरगाव, बोरगाव इत्यादी गावांतर्गतवाड्या व खालापुरीचा काही भाग अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास पळवला आहे. या भागातील नुकसानग्रस्त शेतकरी पुरता अडचणीत सापडल्याने समाजसेवक सुरेश पाटोळे यांनी अश्या कठीण परिस्थितीत आपला वाढदिवस साजरा न करता, हारतुरे न स्विकारता थेट अवकाळी पाऊस व गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली आहे. लगेच शिरुर-कासार तालुक्याचे तहसिलदार श्रीराम बोंडे यांच्याशी संपर्क साधून तालुक्यांतील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यासंदर्भात सुचना केल्या.

     जीवनातील वाढदिवस म्हणजे एक प्रकारचा आनंदाचा क्षण. स्वतःचा वाढदिवस कसा साजरा करावा हे एका सामाजिक कार्यकर्त्यांकडून शिकावे. सध्याच्या परिस्थितीत साधारण कार्यकर्ताही आपला वाढदिवस बँनरबाजी व हारतुरे यांच्यावर खर्च करतांना दिसतो. काही महाभाग तर गौतमी पाटील सारख्या नृत्यांगनाचे कार्यक्रम आयोजित करतात. मात्र या सर्व प्रकाराला फाटा देत जनसेवक सुरेश पाटोळे यांनी सध्याच्या परिस्थितीत गारपिट व अवकाळी पाऊसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जावून दुःखाश्रू पुसन्याचे महान कार्य केल्याने बीड जिल्हयात एकच चर्चेचा विषय बनला आहे. यावेळी तहसीलदार एन. एम. खेडकर, तलाठी चिंतामन सानप, माजी सरपंच सुरेश शिंदे, नवनाथ मुळे, बपा शिंदे, कांताराम पवळ, नितिन मळेकर, भास्कर शिंदे, सचिन पवळ, संतराम खोले, राजू शिंदे आदी अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

••••••••••••••••


अवकाळी पाऊस व गारपीट ग्रस्त शेतकरी अडचणीत असतांना आनंदाचा क्षण नाकारत अन्नदात्यांच्या दुःखात सहभागी होत थेट बांधावर जावून नुकसानीची पाहणी केल्याने सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

••••••••••••••••••••••





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.