* गांधी महाविद्यालयामध्ये एन.एस.एस. प्रमाणपत्रचे वाटप
***********************
***********************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे श्रीमती शांताबाई कांतीलाल गांधी कला, अमलोक विज्ञान, आणि पन्नालाल हिरालाल गांधी वाणिज्य महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने एन.एस.एस. प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस.राठी,उपप्राचार्य ज.मो.भंडारी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.विष्णू गव्हाणे, सह कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.थोरवे,सह कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.मीरा नाथ, प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर, प्रा.डॉ.अनिल गर्जे, प्रा.डॉ.शेखर तळेकर, जी.एस.किरण शिनगीरे, विद्यार्थिनी प्रतिनिधी पल्लवी आंधळे, एनएसएस प्रतिनिधी ज्ञानेश्वर रांगुळे,प्रमोद कन्हेरकर,वैभव ढोबळे, महेश दळवी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी, स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी किरण शिनगीरे, विद्यार्थिनी प्रतिनिधी पल्लवी आंधळे,रा.से.यो. विद्यार्थी प्रतिनिधी प्रमोद कन्हेरकर यांनी परिश्रम घेतले. प्रमाणपत्र वाटप केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.
या कार्यक्रमासाठी अमोलक
जैन विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी कांतीलाल चाणोदीया, हेमंत पोखरणा डॉक्टर उमेश गांधी यांनी शुभेच्छा दिल्या.
stay connected