*केज शहरात आ.नमिता मुंदडा यांच्या हस्ते विविध विकासकामांचा २९ मार्चला लोकार्पण व भुमिपूजन सोहळा...*
भाजप जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व रमेशराव आडसकर यांची राहणार उपस्थिती...
*निर्धार नगरपंचायतचा कायापालट केज शहराचा**दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती....हारून इनामदार*
केज/प्रतिनिधी
केज नगरपंचायत ने विकास कामावर भर देत त्यांनी शहरासाठी आणलेल्या विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ व लोकार्पण सोहळा बुधवार (दि.२९) मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता नगरपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन केज मतदारसंघाच्या आ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाला भाजप जेष्ठ नेते रमेशराव आडसकर,नंदकिशोर मुंदडा,युवा नेते अक्षय मुंदडा,कृषी उत्पादन बाजार समितीचे मा.सभापती अंकुशराव इंगळे,जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुण भाई इनामदार,मा,नगराध्यक्ष आदित्य पाटील,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी शरद झाडके,तहसीलदार दुलाजी मेंडके,मा.सरपंच युवराज दादा काळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते केशव कदम,गटनेते, न.प. राजुभाई इनामदार, न.प.गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रामचंद्र गुंड, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश तात्या पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे, शिवसेना तालुकाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे, रोटरी क्लबचे अध्यक्ष पशुपतीनाथ दांगट,जेष्ठ मार्गदर्शक रमेश गुळभिले,भाजप तालुका अध्यक्ष भगवान केदार, डॉ.सेलचे भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.वासुदेव नेहरकर, डॉ,त्र्यंबट चाटे,आर.पी.आय.ता.अध्यक्ष दीपक कांबळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
केज नगरपंचायत अंतर्गत ५०० लक्ष रुपये कामाचा शुभारंभ सोहळा व बांधकाम मजुरांना किट वाटपाचा कार्यक्रमाला केज शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड,उपनगराध्यक्षा शीतलताई दांगट,नगरपंचायतचे मुख्याधिकारी महेश गायकवाड,सर्व सभापती,नगरसेवक,व कर्मचारी,नगरपंचायत कार्यालय केज यानी केले आहे.
stay connected