लातूर प्रतिनिधी चंद्रकांत पाटील
*राष्ट्रवादी काँग्रेसची कृषि उत्पन बाजार समिती निवडणुकी संदर्भात बैठक सम्पन्न.*
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निलंगा ची कृषि उत्पन्न बाजार समिती निलंगा व कृषि उत्पन्न बाजार समिती औराद च्या निवडणुकी संदर्भात बैठक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ व तालुका अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी दोन्ही निवडणूका जोमाने लढण्याचा व दोन्ही बाजार समिती वर राष्ट्रवादी चा झेंडा फडकावयाचा निर्धार व्यक्त केला. व निवडणूकची व्युह रचना आखण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय चे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, विधानसभा अध्यक्ष सुधीर मसलगे, शहराध्यक्ष इस्माईल लद्दाफ, माजी नगरसेवक हासन चाऊस, उपाध्यक्ष अंगद जाधव, सचिन कडतने, युवक कार्याध्यक्ष महेश चव्हाण, राजु मोरे, उद्धव मेकाले, रोहित पाटील, अमर माने, सुरेश रोळे, प्रल्हाद पाटील, बालाजी जोडतले पवार, गुणवंत जाधव, प्रकाश धुमाळ, हरीदास साळुंके, विजयकुमार सुर्यवंशी, अविनाश सुर्यवंशी, राम चव्हाण, अलीमुद्दीन शेख, अरुणकुमार सुर्यवंशी, व तसेच अनेक गावचे सरपंच व सदस्य, सोसायटीचे चेअरमन व सदस्य, व बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
stay connected