*कवयित्री सौ. गीतांजली योगेश वाणी सुनिर्मल फाऊंडेशनच्या महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्काराने सन्मानीत*
सुनिर्मल फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, पत्रकारिता, कला, क्रिडा अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी (१९ मार्च ) *महाराष्ट्राची रणरागिणी* पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
द्विप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. उपस्थित मान्यवरं पाहुण्यांचे सुनिर्मल फाऊंडेशनच्या वतीने स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला.
महाराष्ट्राच्या रणरागिणी पुरस्कारासाठी संपुर्ण महाराष्ट्रातुन मुबंई, ठाणे, कोकण, संभाजी नगर, सोलापूर, नाशिक, पुणे आणि सातारा, परभणी येथून महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी माननीय डॉ.जग्गनाथराव हेगडे (मा. नगरपाल मुंबई), श्रीमती प्राजक्ता अविनाश वाडये (प्रसिद्ध अभिनेत्री रात्रीस खेळ चाले - सरिता), सौ. राजश्री नीरज बोहरा (अध्यक्षा, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे - मुंबई प्रदेशाध्यक्षा), सौ.राजश्री चंद्रकांत काळे (अभिनेत्री - रेतीवाला नवरा पाहिजे), सौ.सिद्धी विनायक कामथ (अभिनेत्री - बाळू मामाच्या नावानं चांग भलं) यांच्या हस्ते सौ. गीतांजली योगेश वाणी यांना साहित्यिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी आकर्षक सन्मानचिन्ह तसेच सन्मानपत्र फ्रेम देऊन गौरविण्यात आले.
सौ. गीतांजली वाणी ह्या गेली एकोणाविस वर्ष ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. त्या शीघ्र कवयित्री व उत्कृष्ट निवेदिका आहेत. त्यांचे *दर्पण* चारोळी संग्रह व *काव्यांगी* अष्टाक्षरी काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. अनेक वर्तमानपत्र, दिवाळी अंक, प्रातिनिधीक काव्यसंग्रहात त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. लिखाणाचा वारसा त्यांना त्यांच्या स्वर्गीय पिता कै. खंडेराव अमृतकर यांचेकडून लाभला आहे. त्या अखिल भारतीय साहित्य परिषद, पुणे - मुंबई प्रदेश अंतर्गत उत्तर मुंबई अध्यक्षा आहेत तसेच शब्दशिल्प कलाविष्कार संघ या नोंदणीकृत साहित्यिक समूहाच्या कार्याध्यक्षा आहेत. माझी लेखणी साहित्य मंच विश्वस्त आहेत. कोरोना काळात त्यांनी सकारात्मकता जागरूक व्हावी म्हणून ऑनलाईन उपक्रम, स्पर्धा, संमेलन राबवून नवोदित साहित्यिक घडविले. काही काव्यसंग्रहांना, आत्मवृत्त इत्यादीला शुभेच्छा - प्रस्तावनाही त्यांनी लिहील्या आहेत. त्यांनी पन्नास हून अधिक कार्यक्रम उत्कृष्ट निवेदन केले आहे. महाराष्ट्राची रणरागिणी ह्या पुरस्काराने साहित्यिक क्षेत्रात आणिक उत्तम योगदान देण्याची प्रेरणा मिळाली याआधी स्व. अभिनेत्री स्मिता पाटील शब्दपेरा, कला गौरव, वर्ल्ड इंटरनॅशनल पोएटेस असे साहित्यिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सौ. गीतांजली वाणी यांना संपूर्ण महाराष्ट्रातील विविध स्तरातून अभिनंदन होते आहे.
stay connected