*🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩
गुढीपाडवा*
नविन वर्षाचा सणाचा गोडवा
पहिला सण येतो गुढीपाडवा
चैत्र महिना आहे खास
पुरणपोळी चा खाऊ घास
गुढी उभारू आपल्या दारी
सुरेख रांगोळी काढु दारी
साडी गडवा लिंबोणी गाठी
उंच उभारु गुढीची काठी
चैत्र महिन्याचा मला अभिमान
रामनवमीचा उत्सव छान
चैत्रात आंब्याला येतो बहर
कैरी खाण्याची मुलांना लहर
स्वामींच्या प्रगटदिनाचा अभिमान
महावीर, हनुमान जयंती ला मान
नविन वर्षाच्या मनापासून
सदिच्छा
मराठीतुन देऊ एकमेकांस शुभेच्छा
नविन वर्षाचा हाच संकल्प करुया
हिंदु असल्याचा अभिमान राखुया
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*कवयित्री सुप्रिया सुरेश झिंजुर्डे*
जि प प्रा शाळा गंगानगर नेवासा
ता नेवासा जि अहमदनगर
९९६०४७०१२५
stay connected