महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण च्या माध्यमातून लोणी गावासाठी जवळपास दहा कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना शासनाकडून मंजूर💦

 💐🌹🌹💦 महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण च्या माध्यमातून लोणी गावासाठी जवळपास दहा कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना शासनाकडून मंजूर💦💦🌹




 

पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाऱ्या पाईपच्या चार गाड्या आज गावात दाखल पुढील जवळपास 35 वर्ष गावाचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.

आत्ताच काही दिवसापूर्वी झालेल्या लोणी ग्रामपंचायत च्या निवडणुकीमध्ये आम्ही जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार गावातील सर्व नागरिक ,माता भगिनींना 24 तास पाणी मिळण्यासाठी आम्ही दिलेला शब्द पाळणार आहोत. नव्हे तर तुमच्या उपकारातून उतराई होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.

लोणी गावाच्या सर्व दीशांना असणाऱ्या गावातील सर्व वाडी वस्तीवर योजना कार्यान्वित होणार आहे.

सर्वांना मुबलक पाणी मिळण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जाणार आहेत.

आमदार सुरेश आण्णा धस, माजी आमदार भीमराव धोंडे, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार साहेबराव दरेकर व तालुक्यातील सर्वच नेत्यांच्या मार्गदर्शनाने ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येईल अशी माहिती नवनिर्वाचित आदर्श सरपंच माननीय संजय रक्ताटे सर यांनी दिली.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.