सुरत न्यायालयाने काॅंग्रेसचे मा.अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने रेणापुर येथे जाहिर निषेध ...

 रेणापूर / प्रतिनिधी - जिवण जाधव .......


सुरत न्यायालयाने काॅंग्रेसचे मा.अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी  रद्द केल्याने रेणापुर येथे जाहिर निषेध ...






सुरत न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष . राहुलजी गांधी  यांना मोदी आडनावावरून चोर या शब्दाने भाषणातुन टीका केल्यामुळे दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. यानंतर मोदी सरकारने काही वेळातच खासदारकी  रद्द केली. या घटनेच्या निषेधार्थ देशभर काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. या  घटनेचा जाहिर निषेध म्हणून रेणापूर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त  करण्यात आला.

निरव मोदी, ललित मोदी, अदानी.यांच्या  महा घोटाळ्याच्या चौकशी ची मागणी संसदेत लावून धरली तसेच भारत जोडो यात्रा दरम्यान 3500 किलोमीटरचा प्रवास करून लोकांचे प्रेम व संपर्क वाढल्यामुळे  मोदी सरकारला हि काॅंग्रेस पक्षाबद्दल असलेली लोकांची लोकप्रीयता पाहवत नसल्याने   विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा केंद्र सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे याचा निषेध देशभर काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.

याप्रसंगी रेणापुर  तालुकाध्यक्ष प्रमोद आबा जाधव, शहराध्यक्ष मतीन आली सय्यद, गोविंद पाटील, पदम पाटील, हनुमंत आत्या पवार, रेनापुर तालुका सरचिटणीस महेश खाडप, भुजंग पाटील काम खेडकर, दिनेश पाटील, सतीश चव्हाण, अनिल पवार, पठाण सर, प्रकाश सूर्यवंशी, प्रदीप काळे .ॲड विश्वासराव देशमूख.पंडित माने.उमाकांत कलंदरी .महिला तालुकाध्यक्ष पुजा इगे .स्वाती सोमानी .अनिता शिंदे.सह 

रेणापुर  तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.