हुकूमशहा किम जोंग उन यांनी एका शहरात केले लॉकडाऊन

  हुकूमशहा किम जोंग उन यांनी एका शहरात केले  लॉकडाऊन 



उत्तर कोरियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील हुकूमशहा किम जोंग उन यांनी एका शहरात लॉकडाऊन केले आहे. कारण या शहरातील सैनिकांकडून ६५३ बंदुकीच्या गोळ्या गायब झाल्या आहेत. आता त्या शोधण्यासाठी संपूर्ण शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे

का वृत्तानुसार, ७ मार्च रोजी सैन्य माघारीदरम्यान ६५३ गोळ्या गायब झाल्या. जोपर्यंत सर्व गोळ्या सापडत नाहीत, तोपर्यंत शहरात लॉकडाऊन राहील, असा सरकारतर्फे कडक आदेश देण्यात आला आहे. पोलिस आणि लष्कर दोघेही मिळून या बंदुकीच्या गोळ्यांचा शोध घेत आहेत, मात्र १० दिवस उलटून गेले तरी अद्याप या गोळ्या सापडलेल्या नाहीत.

दरम्यान, ही घटना रियांगगँगच्या उत्तर भागातील हेसन शहरात घडली. शहरात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे दोन लाख लोकसंख्या घरात कैद झाली आहे. बंदुकीच्या गोळ्या गायब झाल्यापासून सैनिकांकडून शोध मोहीम सुरू आहे. लष्कराचे अधिकारी घरोघरी शोधमोहीम राबवत आहेत.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.