पुन्हा एका अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या

पुन्हा एका अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या



 आष्टी - तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील बीडसांगवी येथे आजोळी राहणाऱ्या एक अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. हि घटना ताजी असतानाच बीडसांगवी या गावाजवळच असलेल्या वेताळवाडी येथिल एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन बुधवारी रात्री जिवनयात्रा संपवली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असुन पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वेताळवाडी येथील प्रतिक्षा सुरेश वनवे (१६) हिने बुधवार दि. 29 रोजी रात्री 7:00 वा. च्या दरम्यान राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांच्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. या आत्महत्याचे कारण अद्याप कळवु शकले नाही. आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.